Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

प्रा. गजानन राऊत आचार्य पदवीने सन्मानित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती: विदर्भ कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स जिवती या महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक पदावर कार्यरत मराठी विभागप्रमुख प्रा.गजानन शामसुंदर राऊत यांना नुकतीच गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत आचार्य पदवी प्रदान करण्यात आलेली आहे. त्यांच्या आचार्य पदवीचा विषय आहे.

“समकालीन साहित्य प्रवाह आणि इसादास भडके यांचे साहित्य : एक चिकित्सक अभ्यास” असून त्यांनी सखोल संशोधनाअंती प्रबंध विद्यापीठाकडे सादर केला होता. समीक्षक प्रा. डॉ. राजकुमार मुसने यांच्या मार्गदर्शनात त्यांनी संशोधन पूर्ण केले आहे. ग्रामीण भागातून उदयास आलेल्या अतिसामान्य कुटुंबातील साहित्यिक डॉ. इसादास भडके यांच्या साहित्याचा सखोल अभ्यास करून त्यांच्या साहित्यातील प्रमुख घटक व त्यांचे योगदान स्पष्ट केले आहे.

गजानन राऊत यांना मिळालेल्या आचार्य पदवीच्या यशाचे श्रेय ते मार्गदर्शक प्रा.डॉ. राजकुमार मुसने, डॉ. इसादास भडके त्यांच्या आई कुसूम राऊत, वडील श्यामसुंदर राऊत, पत्नी नीलू राऊत तसेच संपूर्ण परिवार आणि त्यांना वेळोवेळी मिळालेले सहकार्य कार्यरत श्री. व्यंकटेश बहुउद्देशीय संस्था गडचांदुर चे सर्व पदाधिकारी, प्राचार्या शाक्य मॅडम, सहकारी प्राध्यापक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी,मित्र परिवार यांना देतात.

माणिकगड पहाडावरील अतिदुर्गम भागात अध्यापन करणाऱ्या प्रा .गजानन राऊत यांनी कष्टपूर्वक केलेल्या संशोधनामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये