Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

चांदा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी २५ वी कॅडेट, सबज्युनिअर अँड ज्युनिअर नॅशनल सिकाई मार्शल आर्ट चॅम्पियनशिप मध्ये पदके पटकाविले

चांदा ब्लास्ट

महासंघ (S.G.F.I) हरियाणा राज्य क्रीडा परिषद, क्रीडा व युवक प्राधिकरण, क्रीडा सिकाई असोसिएशन ऑफ हरियाणा व सिकई फेडरेशन ऑफ इंडिया मान्यताप्राप्त. दिनांक ७, ८ आणि ९ डिसेंबर २०२४ ताऊ देवीलाल क्रीडा संकुल, (ऑलम्पिक भवन हरियाणा), पंचकुला, हरियाणा येथे २५ वी कॅडेट, नॅशनल सबज्युनिअर अँड ज्युनिअर सिकाई मार्शल आर्ट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत अनेक राज्यातून (१५ राज्य ) ५०० ते १००० खेळाडूंचा समावेश होता. चांदा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत, रौप्य आणि कांस्य पदके प्राप्त करून चंद्रपूर जिल्ह्याचे व महाराष्ट्राचे तसेच शाळेचे नाव शिखरावर पोहचवीले आहेत.

विद्यार्थ्यांचे पुढील प्रमाणे नावे व खेळ प्रकार :-

एरो सिकाई मिक्स ग्रूप, एरो सिकाई ग्रूप आणि लोबा.

वयोगट:- ११ आणि १४ वर्षे मुले/ मुली

सार्थक राजेश पोलावार – रौप्य पदक

आहील रफी मोहम्मद – रौप्य पदक

अथर्व सुजित कडसकर – रौप्य पदक

एलीन राकेश सुनार – कांस्य पदक

निधी गणेश कृष्णपल्लीवार – कांस्य पदक

उत्कर्ष नरेंद्र डवरे – सहभाग

शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जीवतोडे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केले. तर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.आम्रपाली पडोळे यांनीदेखील विद्यार्थ्यांच्या यशाकरिता शुभेच्छा दिल्या, तसेच शाळेचे क्रीडा मार्गदर्शक व शिक्षकवृंद यांनी शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये