Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

खोकरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा

विवीध धार्मिक व सामाजीक कार्यक्रमांचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतूल कोल्हे

         तालुक्यातील खोकरी येथे गुरुदेव सेवा मंडळ तथा गावकऱ्यांच्या वतिने गावातील ग्रामपंचायत पटांगणावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. तिन दिवस चाललेल्या या सोहळ्यात विवीध धार्मिक तथा सामाजीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात भजन संमेलन, कार्यकर्ता मेळावा, ग्रामसफाई,भजन,किर्तन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.याशिवाय गावातून रामधुन काढण्यात आली.यात गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.महाप्रसादाचे वितरणाने सोहळ्याची सांगता करण्यात आली.

सोहळ्यात भटाळीचे सरपंच सुधाकर रोहणकर, विलास नेरकर,शंकर रासेकर,मनीषाताई रोडे,मोहित लभाने,एकनाथ घागी,नागो कामाटकर,स्वप्नील पंतवाने,सुरेश तराळे,कवडू भोगेकर,दिलीप डाखरे,लांबट महाराज, सुभाष सप्रे,पुंडलीक धोबे,मारोतराव ठेंगणे, नामदेव काकडे, पंकज वांढरे,तुषार माथानकर,ओम सरोदे,तुळशीबाग वांढरे,आशीष नगराळे,गजानन ढवस,महादेव काकडे, दिनेश भोस्कर, चिलाराम कुमरे,जनार्धन नगरकर,मारोती मांडवकर,शालीक कुमरे आदी मान्यवर सहभागी झाले होते.

सोहळ्यात ४९भजन मंडळांचा सहभाग होता या सर्व भजन मंडळांचा राष्ट्रसंतांचा फोटो,साऊंड बॉक्स देऊन सुधाकर रोहणकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला याशिवाय ऊपस्थीत सर्व सरपंचांचा शाल,श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये