Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

यशवंत महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यापीठाच्या गुणवता यादीत

संस्थाध्यक्ष माननीय समीरभाऊ देशमुख यांच्या हस्ते गुणवंतांचे अभिनंदन व सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

     स्थानिक यशवंत महाविद्यालयातील विध्यार्थी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ उन्हाळी परीक्षा 2023-24 इतिहास विषयामध्ये सलग चार विध्यार्थी गुणवत्ता यादीत आले. रा. तू. म. नागपूर विद्यापीठच्या प्रथम मेरिट, सुवर्ण व रजत पदकाचा मान रत्नमाला राधेश्याम उपरीकर या विद्यार्थिनीला मिळाला. बबलू म्हैसके हा विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत २ रा मेरिट तर कु. मोनाली खोब्रागडे व वैभव डब्बावार यांनी ७ वा मेरिट येण्याचा बहुमान प्राप्त केला. याप्रसंगी गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे सर्वस्वी अभिनंदन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मा. समीरभाऊ देशमुख, अध्यक्ष, यशवंत ग्रामीण शिक्षण संस्था, वर्धा तसेच प्राचार्य डॉ. गिरीश ठाकरे यांनी गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीकरिता विशेष शुभेच्छा देत भविष्यातील तयारी साठी महाविद्यालय सदैव तत्पर राहील तसेच विद्यार्थ्यांच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणी सोडवण्यासाठी आम्ही मदत करू अशी हमी व्यक्त केली. तसेच लोकनेते प्रा. सुरेशभाऊ देशमुख, माजी आमदार तथा माजी अध्यक्ष, यशवंत ग्रामीण शिक्षण संस्था, वर्धा. माजी प्राचार्य डॉ. विलासराव देशमुख यांनी देखील अभिनंदन केले. इतिहास लेखक तथा संशोधक डॉ. वीरेंद्रसिंग बैस यांनी देखील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. यशवंत महाविद्यालयातील इतिहास विभागाच्या वतीने सर्व गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

      सर्व गुणवंत विध्यार्थ्यानी आपल्या यशाचे श्रेय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ गिरीश ठाकरे, संस्थेचे अध्यक्ष समिरभाऊ देशमुख यांना दिले. इतिहास विभाग प्रमुख डॉ. नरेश कवाडे यांनी अभ्यासातील सातत्य, चिकाटी, जिद्द व विभागातील मार्गदशक प्राध्यापक यामुळेच हे यश मिळू शकले असे विचार व्यक्त केले. याप्रसंगी डॉ. रवींद्र बेले, डॉ. दीपक महाजन, डॉ. अतुल शिदुरकर, डॉ एन. एच. खोडे, प्रा. संदीप रायबोले डॉ. संदीप चव्हाण, डॉ. बुद्धघोष लोकहरे, प्रा. राहुल भालेकर, प्रा. अरुणा हरले, डॉ. प्रतिभा काटकर, डॉ. संजय धोटे प्रामुख्याने उपस्थित होते. इतिहास विभागातील प्रा. रुपेश वनशिंगे, प्रा. निलेश क्षिरसागर, प्रा. चंद्रकांत राडे, प्रा. देवेंद्र उरकुडे, डॉ. संजय पुनस्कर यांनी गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये