ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीस स्टेशन रामनगर चोरीच्या गुन्ह्यात फारार / पाहीजे असलेला आरोपी हा पो.स्टे. रामनगर दारूबंदी पथकाचे जाळ्यात.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशन रामनगर येथील दाखल अप.क्र. 338/2025 कलम 331 (3), 331(4), 305 (अ), 3(5), बि.एन.एस. चे चोरीचे गुन्ह्यातील फरार / पाहीजे असलेला कुख्यात आरोपी नामे मुन्ना उर्फ देविदास थुल, वय 40 वर्ष, रा. वार्ड.क्र.06 आनंद नगर फुलफैल वर्धा हा गुन्ह्यातील आरोपी असुन नमूद घटने तारेखा पासुन फरार /पाहीजे होता तो पोलीसांची नजर चुकवून आपले अस्तित्व लपवून राहत होता.

पोलीस अधिक्षक सा. वर्धा यांचे आदेशांने पो.स्टे. रामनगर मधील गुन्ह्यातील फरार / पाहीजे आरोपी शोध मोहीम राबवून जास्तीस्त जास्त आरोपीतांचा शोध घेवून कारवाई करण्याची मोहीम राबवीत असतांना फरार/पाहीजे पथक पो.स्टे. रामनगर यांना आज दिनांक 15/10/2026 रोजी गुप्त बातमीदारा कडून माहीती मिळाली की पो.स्टे. रामनगर येथील चोरीच्या गुन्ह्यात पाहीजे असलेला आरोपी नामे मुन्ना उर्फ देविदास थूल, वय 40 वर्ष, रा. वार्ड.क्र.06 आनंद नगर फुलफैल वर्धा हा नुकताच त्याचे राहते घरी फुलफैल आनंद नगर येथे येवून लपुन बसलेला आहे. अशी माहीती मिळताच पो.स्टे. रामनगर येथील फरार / पाहीजे पथक हे रवाना होवून मिळालेल्या माहीती प्रमाणे त्याचे राहते घरी आनंदनगर पो.स्टे. वर्धा शहर हद्दीत जावून त्याचा बारकाईने शोध घेतला असता नमूद आरोपी हा पोलीसांना चकमा देवून पळून जात असतांना पथकातील अमलदार यांनी त्याचा पाठलाग करून मोठ्या शिताफीने त्यास ताब्यात घेतले व ताब्यात घेवून पुढील कारवाईस पोलीस स्टेशन रामनगर येथे दाखल केले.

सदरची कारवाई मा. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधिक्षक सा. जिल्हा- वर्धा, मा. सदाशिव वाघमारे. अप्पर पोलीस अधिक्षक वर्धा, तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा श्रि महाडीक यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षण पोर्णीमा राखोंडे, पोलीस स्टेशन रामनगर यांचे निर्देर्शनात करण्यात आली. सदर कारवाई मध्ये फारार / पाहीजे पथकाचे अवि बनसोड, मनोज भोमले, विक्की अनेराव, मुकेश वांदीले यांनी कारवाई केलेली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस स्टेशन रामनगर येथील अधिकारी करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये