वायगाव (तु)येथे विद्यार्थ्यांनी बांधला बंधारा
जलसंवर्धनाची जाणीव : शाळेच्या परिसरातील ओढ्यावर बंधारा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
श्री जगन्नाथ बाबा विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय, वायगाव (तु) येथे विद्यार्थ्यांमध्ये जलसंवर्धनाची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने वनराई बंधारा बांधण्याचा उपक्रम राबविण्यात आला. शाळेच्या परिसरातील ओढ्यावर हा बंधारा बांधण्यात आला असून त्यातून पाण्याचा साठा वाढण्यास हातभार लागणार आहे.
या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक नंदकिशोर धानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
कार्यक्रमात पुढील शिक्षकांची उपस्थिती होती अविनाश टोंगे,खुशाल पाटील,मंगेश बोढाले,अर्चना जाधव,अमृत ताजने,रमेश करमनकर,विजय शेंडे,स्वप्नील वानखेडे तसेच शाळेतील शिपाई रघुनाथ चिकनकर,बंडू कष्टी,सुनील मोंढे यांनीही बंधारा उभारण्यात सक्रिय सहभाग नोंदवला.
या उपक्रमात शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी आपल्या श्रमदानातून पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी अंगिकारल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले. शाळेचा हा उपक्रम परिसरातील इतर संस्थांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.



