समृद्धी महामार्गावर अज्ञात वाहनाने क्रेनला दिली धडक ; क्रेनचे काही प्रमाणात झाले नुकसान
अभय खोब्रागडे पोलिस हवालदार पोलिस स्टेशन सावंगी मेघे हे तपास करीत आहेत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक ९ जून २०२६ रोजी फिर्यादी नामें नवल किशोर राजुरकर वय ५० वर्ष धंदा ट्रक ड्रायव्हर राहणार वर्धा तहसील जिल्हा वर्धा हे आपले क्रेन क्रमांक एम एच ३२-एस ९०२६ ने धामणगाव वरुन वर्धेकडे रात्रीच्या दरम्यान ११ वाजताच्या सुमारास समृद्धी महामार्ग चॅनल क्रमांक ५९/७०० नागपूर कॅरिडोर ने वर्धेकडे येत असताना अज्ञात ट्रकने मागून येवून धडक दिल्याने क्रेन तिसऱ्या लेनवरुन पहिल्या लेनवर MACB बॅरिगेट ला धडकून अपघात झाला अपघातामध्ये फिर्यादीला काही हि मार लागला नाही परंतु क्रेन ड्रायव्हर साईडचा दरवाजा चेचेस इत्यादी भागाला धडक लागल्याने क्रेनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
यावेळी पोलिस स्टेशन सावंगी मेघे येथे अपघात क्रमांक १८/२०२६ दिनांक १० जून २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावेळी पुढील तपास पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल वर्धा अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे वर्धा उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन सावंगी मेघेचे ठाणेदार विनोद गिरी यांच्या नेतृत्वाखाली पोलिस हवालदार अभय खोब्रागडे बक्कल पोलिस शिपाई केतन बावणे बक्कल नंबर ९६१ पोलिस हवालदार दिगंबर भगलकर बक्कल नंबर ८२७ महिला पोलिस शिपाई प्रगती झांबरे १३४५ महिला पोलिस हवालदार प्रियंका घोगरे ८५५ पोलिस स्टेशन सावंगी मेघे हे करीत आहेत



