चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी : येथील वरिष्ठ ऍडव्होकेट मनोहर मारोतराव उरकुडे (७५) यांचे आकस्मिक निधन झाले. ते बार कोंसिलचे माजी अध्यक्ष होते.
तसेच सुप्रसिद्ध वकील म्हणून परिसरात प्रसिद्ध होते. त्यांनी देहदान केले असल्याने त्यांचा देह शासकीय रुग्णालयाकडे सोपविण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुली, मुलगा, पत्नी, नातवंडे असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.