Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

पोलीस स्टेशन सिंदी रेल्वे पोलीस पथका कडुन विदेशी दारू व दुचाकी वाहणासह 1 लाख 7 हजाराचा माल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशन सिंदी रेल्वे येथील पथकाने आज दिनांक 28/11/2024 रोजी त्यांना खास मुखबिर कडुन माहीती मिळाले की, परसोडी उड्डाण पुलावर सिंदी रेल्वे शिवारात नाकेबंदी करून प्रोव्हीशन रेड केला असता आरोपी नामे अनुप संजय सपारिया वय 26 वर्ष रा. कंजर मोहल्ला इतवारा बाजार ता.जि. वर्धा 1) एक लालसर कथीया रंगाची टि.व्ही.एस. ज्युपीटर कंपनिची मोपेड जिचे मागे व पुढे नंबर प्लेट नसलेली किंमत अंदाजे 90,000रू 2) एका काळ्या रंगाचे बॅग मध्ये 500 एम.एल. च्या टुबर्ग कंपनिच्या टिन बिअर दारूने भरून असलेल्या एकुण 48 नग प्रति नग 300रू प्रमाणे एकुण 14,400रू 3) 180 एम.एल. च्या देशी दारूने भरून असलेल्या संत्रा लावणी कंपनिच्या काचेच्या 12 शिश्या प्रति नग किंमत 150रू एकुण 1800रू 4) एक काळया रंगाची बॅग किंमत 800रू असा एकुण जुमला किंमत 1,07,000रू चा माल मिळुन आल्याने पंचनामा कार्यवाही करून आरोपी विरूध्द अपराध क्रमांक 0391/24 कलम 65 अ, ई, 77 अ, महाराष्ट्र दारूबंदी कायदा सहकलम 3 (1) 181, 130/177 मोटार वाहण कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. अनुराग जैन सा, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री सागर कवडे सा, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा, श्री प्रमोद मकेश्वर सा. याचे विशेष मार्गदर्शन व सुचनेप्रमाणे सहा. पोलीस निरिक्षक संतोष दरेकर पो.स्टे सिंदी रेल्वे यांचे मार्गदर्शनात पोलीस हवालदार आनंद भस्मे, प्रफुल डफ, पो.शि. उमेश खामनकर, कांचन चाफले, नितीन नखाते, सर्व नेमणुक पो.स्टे. सिंदी रेल्वे यांनी केलेली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये