ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

३ नोव्हेंबरपासुन खाद्यपदार्थांची विक्री व प्रदर्शनी

मनपा मार्फत महिला बचत गटांचा उपक्रम

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे दिनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत दि.३ ते ७ नोव्हेंबर दरम्यान महिला बचत गटांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थांची विक्री व प्रदर्शनी ज्युबली शाळेजवळ असलेल्या कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित केली जाणार आहे.

     सकाळी ११ ते रात्री १० पर्यंत सुरु असणाऱ्या या विक्री व प्रदर्शनीत नागरिकांना स्वस्त दरात मुबलक खाद्य पदार्थ व वस्तु घेता येणार आहे. यात दिवाळी सणानिमित्त महिला बचत गटांनी तयार केलेले चकली, चिवडा, लोणचे, फराळी वस्तूंचा आस्वाद घेता येणार आहे तसेच कापडी बॅग, दिवे, मातीच्या वस्तु अश्या अनेक वस्तुही विक्रीस राहणार आहेत. सदर विक्री व प्रदर्शनी ३ ते ७ नोव्हेंबर पर्यंत असल्याने नागरिकांना भेट देण्यास ५ दिवस मिळणार आहे. तसेच सकाळी ११ ते रात्री १० पर्यंत सुरु असल्याने सर्व वयोगटाच्या व्यक्तींना भेट देता येणार आहे.

    शहरातील नागरिकांनी महिला स्वयंसाह्य बचत गटांनी तयार केलेल्या वस्तुंची खरेदी करून बचत गटातील महिलांना व्यवसाय करण्याकरिता हातभार लावावा तसेच बचतगटांनी तयार केलेल्या चविष्ट व्यंजनांचा आस्वाद घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये