ताज्या घडामोडी

ऊर्जानगर वसाहतीच्या विकासासाठी मी सदैव वचनबद्ध

संवाद सेतू वार्तालापात सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही

चंदा ब्लास्ट

ऊर्जानगर वसाहतीमध्ये जेव्हा नैसर्गिक आपत्ती आली तेव्हा मी तत्परतेने मदत केली, या वसाहतीमध्ये पुराचे पाणी शिरले तेव्हा महानिर्मिती कम्पनीच्या नियमात तरतूद नसताना व्यवस्थापकीय संचालक यांच्या स्तरावर पाठपुरावा करून नुकसान भरपाई मिळवून दिली. तंत्रज्ञ 3 च्या प्रमोशन प्रकरणात देखील मी सकारात्मक सहकार्य केले. 15 कोटी रु किमतीचे सांस्कृतिक भवन मी ऊर्जानगरात दिले. येत्या काळात अत्याधुनिक जिम आणि जलतरण तलाव आपण या परिसरात देणार आहोत. विकासाची प्रक्रिया अशीच कायम सुरु राहणार असून या निवडणुकीत ऊर्जानगर वसाहत वासियांनी मला सर्वशक्तीनीशी सहकार्य करावे असे आवाहन बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे भाजपा महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

सुधीर मुनगंटीवार यांनी उर्जानगर वसाहतीतील नागरिकांशी संवाद सेतू च्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, महानिर्मिती कंपनीत भरती प्रक्रियेत वीज कर्मचाऱ्यांच्या आरक्षणाचा मुद्दा मी सरकार दरबारी रेटत आहे. ऊर्जानगर वसाहतीमधील उर्वरित बिल्डिंगचे नूतनीकरण, कामगार मनोरंजन केंद्र व कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या इमारतिचे नूतनीकरणाचे काम देखील मी प्राधान्याने करणार आहे. ऊर्जानगर रिंगरोडचे डांबरिकरण, रोड साईडला पेव्हर ब्लॉक, कोयना गेट वसाहती पर्यंत रोड दुभाजक व दोन्ही बाजूला विद्युत व्यवस्था करण्यासाठी देखील मी प्रयत्नशील आहे. 800 मेगावॅटचे नवीन संच बसविण्याची प्रक्रिया देखील सुरु आहे. ऊर्जानगर वसाहतीतील नागरिकांना मी विकासासाठी आजवर सहकार्य केले आहे व सदैव करेल. आपण मतरूपी आशीर्वाद देत मला सहकार्य करावे असे आवाहन सुधीर मुनगंटीवार यांनी केले. यावेळी रामपाल सिंह, हनुमान काकडे, नामदेव आसुटकर आदींची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये