ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतकरी व शेतमजुरांचा केवळ प्रहारच वाली : आ. बच्चू कडू

प्रहार जनशक्ती पक्षाची भद्रावती येथे जाहीर सभा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुती हे दोघेही एकाच माळेचे मनी असून त्यांचे शेतकरी व शेतमजूर यांच्या विषयीचे प्रेम बेगडी आहे.या दोन्ही शासनाच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीत शेतकरी व शेतमजुरांची सर्वत्र अवहेलनाच करण्यात आली असून त्यांची स्थिती दिवसेंदिवस हलाखीची होत चालली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना व शेतमजुरांना खरा न्याय देण्याचे सामर्थ्य केवळ प्रहार जनशक्ती पक्षात असून तोच त्यांचा वाली आहे.

त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षावर विश्वास टाकून या पक्षाचे उमेदवार विधानसभेत पाठवा असे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख तथा आमदार बच्चू कडू यांनी मतदारांना केले. भद्रावती-वरोरा विधानसभा क्षेत्रातील प्रहार जनशक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार अहेतेश्याम अली यांच्या प्रचारार्थ भद्रावती शहरातील शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाच्या मैदानावर दिनांक 11 ला जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले, त्यात ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर आमदार बच्चू कडू, उमेदवार अहेतेश्याम अली, शेतकरी संघटनेचे नेते तथा विदर्भवादी नेते एड. वामनराव चटप, धर्मेंद्र हवेलीकर, शरद कारेकर, सतीश बिडकर, रवी पवार, दादापाटील झाडे आदी मान्यवर उपस्थित होते. वरोरा शहराच्या नगराध्यक्षपदी निवडून आल्यानंतर अत्यंत प्रतिकूल स्थितीत वरोरा शहराचा नेत्र दीपक असा विकास केला.

जात-पात न पाहता अडीअडचण घेऊन येणाऱ्या गोरगरिबांना ऐपतीप्रमाणे विविध प्रकारची मदत केली,माझा पिंड हा समाजसेवेचा असल्यामुळे मी ते अविरतपणे करीत राहणार आहे,मात्र या सेवेला जर पदाची जोड मिळाल्यास समाज कार्याला गती प्राप्त होऊन मला अपेक्षित असा क्षेत्राचा विकास साधता येईल असे मनोगत यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार अहेतेशाम अली यांनी व्यक्त केले.प्रारंभी आ. बच्चू कडू यांची शहरातील प्रमुख रस्त्यावरून रैली काढण्यात आली.या रैलीव्दारे बच्चू कडू यांचे सभास्थळी आगमन झाल्यानंतर सभेला सुरुवात करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये