मोटर सायकल चोरी करणारा आरोपी व त्याचा साथीदार विधी संघर्षीत बालक स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
हकिकत याप्रमाणे आहे कि, फिर्यादी नामे श्रीकृष्ण श्रावणजी कातलाम रा. आमगाव, तह. सेलु यांनी त्यांचे मालकिची एक हिरो स्प्लेंडर प्लस मोटर सायकल क्र. MH-32/Z-0461 हि त्याचा मित्र अंकुश वैद्य रा. बरबडी याचे घरासमोर खुल्या जागेवर ठेवली होती, परंतु दि 17/10/2024 चे 23ः50 वा. ते दि 18/10/24 चे 15ः45 वा. दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने सदर मो.सा. चोरून नेल्याबाबत पो.स्टे. सिंदी येथे दिलेल्या रिपोर्टवरून अप क्र. 351/2024 कलम 303(2), 3(5) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता, सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्था.गु.शा. वर्धा चे पथक करीत होते. दि. 08/11/2024 रोजी तपासदरम्यान त्यांना मिळालेल्या गोपणीय खबरेवरून, यातील नमुद आरोपी नामे आयुष जगनदास वाटमोडे, वय 20 वर्ष, रा. वार्ड क्र 01 वडणेर, तह. हिंगणघाट व विधी संघर्षीत बालकास मौजा म्हसाळा, सेवाग्राम कडुन येणा-या रेल्वे पुलाजवळ सापळा रचुन ताब्यात घेत, गुन्ह्यासंबंधाने सखोल विचारपुस केली असता, त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केल्याने, त्यांचे ताब्यातुन सदर गुन्ह्यात चोरीस गेलेली एक हिरो स्प्लेंडर प्लस मोटर सायकल क्र. MH-32/Z-0461 कि. 40,000 रू चा माल जप्त करण्यात आला असुन,. आरोपी, विधी संघर्षीत बालक व मोटर साकयल पुढील तपासकामी पो.स्टे. सिंदी यांचे स्वाधीन करण्यात आले.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मा. श्री. अनुराग जैन सा., अपर पोलीस अधिक्षक मा. श्री. डॉ सागर कवडे सा., यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक मा.श्री. विनोद चौधरी सा. यांचे निर्देशाप्रमाणे, पो.उप.नी. प्रकाश लसुंते, पो.अं. मनोज धात्रक, अरविंद येनुरकर, रवि पुरोहित, अभिषेक नाईक, विनोद कापसे, मुकेश ढोके सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.