ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चार शतकांची ऐतिहासिक परंपरा असलेले गायगोधन उत्साहात साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

भद्रावती तालुक्यातील घोट, निंबाळा, हेटी व चालबर्डी (रै.) येथील गाय गोधनाच्या भव्य पटांगणावर बलिप्रतिपदेला स्थानिक गोंड गोवारी जमातीतर्फे गाय गोधन व ढाल पूजन उत्सव थाटामाटात साजरा करण्यात आला. परिसरात गोंड गोवारी जमातीची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे. दरवर्षी आदिवासी संस्कृती व परंपरेनुसार येथील गोंड गोवारी जमातीतर्फे गाय गोधन व ढाल पूजन करून उत्सव साजरा करण्यात येतो या परंपरेला ४०० वर्षांपेक्षाही अधिकचा प्रगल्भ इतिहास आहे.

प्राचीन काळापासून गाई राखणे हा गोंड गोवारी जमातीचा मुख्य व्यवसाय आहे. त्यामुळे चराईसाठी गाई रानात गेल्या असता त्यांचे रक्षण व्हावे, त्यांना कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये म्हणून जमातीतर्फे वाघोबा व नागोबा देवाची पूजा करण्याची परंपरा आहे. या ऐतिहासिक गाय गोधन पूजेला विदर्भातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाला आदिवासी गोंडगोवारी संस्कृती व कल्याण मंडळाचे अध्यक्ष गजानन कोहळे, पत्रुजी नागोसे, केशव सोनवाने, शंकर नेवारे, यशवंत वाघ, संजय ठाकरे, सुमित बोरजे नागपूर, प्रविण नागोसे यवतमाळ, अरूणाताई चचाणे, सविता नेवारे अमरावती, सेजल नेहारे चंद्रपूर, मुरलीधर मानकर, प्रभाकर नेवारे, देवा नागोसे, गुरूदेव राऊत गोंदिया, राजकुमार ठाकरे, वर्धा यांची ट कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता दिलिप राऊत, विलास राऊत, वसंता नागोसे, अनिल नेहारे, शुभम नागोसे, विपुल वाघाडे, कैलास दुधकोहळे, किशोर नेहारे, दौलत दुधकोहळे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन विलास राऊत यांनी तर आभार प्रदर्शन श्याम नेवारे  यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये