ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सेवादास नगरात नवनियुक्त शासकीय कर्मचारी व गुणवंतांचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- तालुक्यातील सेवादासनगर येथील अनेक युवक – युवतींनी विविध क्षेत्रात नावलौकिक केल्यामुळे त्यांचा दिपावलीचे औचित्य साधत भव्य सत्कार करण्यात आला व त्यांची वेगवेगळ्या शासकीय सेवेत अधिकारी म्हणून निवड झालेले आहेत. त्यात अंबादास उत्तमराव राठोड पशुसंवर्धन विभाग, रामचंद्र रामराव राठोड शिक्षण विभाग, प्रेमदास बाबू चव्हाण जलसंपदा विभाग, सौ.पोर्णिमा सुनिल राठोड आरोग्य विभाग, रामदास देविदास जाधव एम आय डी सी, तसेच अश्विन वामन राठोड,

पांडुरंग शंकर राठोड, सुनील नाथराव राठोड यांची एम एस एफ विभागामध्ये निवड झाली आहे.

तसेच बी ए एम एस उत्तीर्ण झालेल्या कु.शिल्पा दादाराव पवार व नव्याने पदोन्नती मिळालेले माधव राठोड कृषी विभाग व इंदल राठोड पोलीस विभाग यांचा गावकऱ्यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी सेवादासनगर येथील नायक,कारभारी व गावकरी मंडळी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये