ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विश्वशांती विद्यालयात मतदार जनजागृती कार्यक्रम साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली द्वारा संचालित विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय सावली येथे दिनांक २४ ऑगस्ट २०२४ रोजी मतदार जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक श्री अनमोल कांबळे, नायब तहसिलदार सावली हे होते. अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक सुधाकर मेश्राम, किशोर संगीडवार,शेखर प्यारमवार उपस्थित होते.यावेळी नायब तहसीलदार कांबळे यांनी लोकशाही पद्धतीत मतदानाचे महत्त्व, शासनाच्या करिअर संबंधीत विविध योजनांची माहिती दिली तसेच शैक्षणिक सुविधांसाठी लागणारे दस्तावेज आॅनलाईन कसे काढावेत ही माहिती दिली.

 विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी विद्यार्थी सहभागाचे महत्व सांगितले.

  कार्यक्रमाचे संचालन राजू केदार तर आभार भुजंग आभारे यांनी केले. या कार्यक्रमा अंतर्गत सुमारे २० नविन मतदारांची नोंदणी झाली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये