ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बोथली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र वाऱ्यावर

आरोग्य केंद्र कुलूपबंद करून डॉक्टर गायब

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांचा वाली कोण?

सावली – आरोग्य सेवा ही अत्यावश्यक सेवा असून पूर्णवेळ मुख्यालयी राहून रुग्णांना सेवा देण्याचे काम डॉक्टरांचे असते,सावली येथून ५ किलोमिटर असलेल्या बोथली येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून परिसरातील जवळपास १५ गावातील नागरिक रोज उपचार घेण्याकरिता आरोग्य केंद्रात येत असतात.मात्र बोथली प्राथमिक आरोग्य केंद्रच कुलूपबंद असल्याने रुग्णांना परत दुसरीकडे जाऊन उपचार करावा लागत असल्याचा प्रकार घडला आहे.

   बोथली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी रात्रीच्या वेळेस दवाखाना बंद करून स्वगावी जाणे ही नित्याचीच बाब असून ही बाब गंभीर आहे.

बोथली परिसरात सध्या तापाची साथ असून उपचारासाठी आरोग्य केंद्रात मोठी गर्दी पहायला मिळत आहे.वातावरणातील बदलामुळे सध्या मानवाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.यात डेंग्यू,चिकुनगुनिया,हिवताप, सर्दी,खोकला,डोकेदुखी आदी आजारांचा नागरिकांना सामना करावा लागत आहे.यातच बोथली येथील दोन्ही वैद्यकीय अधिकारी आपत्कालीन परिस्थितीत गैरहजर असल्याने हजारो रुग्णांचा वाली कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.

     तालुक्यातील बोथली येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. काल सायंकाळच्या सुमारास हिरापूर येथील एका इसमाचा अपघात झाल्याने पायाला गंभीर स्वरूपाची जखम झाली.त्याला उपचारासाठी जवळच्या बोथली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणण्यात आले मात्र दवाखानाच कुलूपबंद करून आरोग्य अधिकारी व कर्मचारी गायब झाल्याने उपचारासाठी रुग्ण ताटकळत होते.यावेळी उपचारासाठी बोथली सहा वर्षाची मुलगीही होती.उपचार करण्यासाठी कोणीही उपलब्ध न झाल्याने सावली येथे रुग्णांना जाऊन उपचार करावा लागला. रुग्णवाहिका चालक गावातील स्थाई व्यक्ती असून सुध्दा रुग्णवाहीका सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली नाही.शेवटी रुग्णांना खाजगी वाहनाने पुढील उपचारासाठी सावली येथे सोडण्यात आले. यामुळे गावात संताप व्यक्त होत असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

       पेशंट आले असता दवाखाना बंद होता. याबाबत तालुका आरोग्य अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना याबाबत फोनवर माहिती दिली परंतु त्यांचेकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी

                 सुशील नरेड्डीवार सरपंच बोथली 

        झालेला प्रकार हा गंभीर असून वरिष्ठांना सूचित करून संबंधित वैद्यकीय अधिकारी आणि वाहनचालक यांचेवर कारवाई करण्यात येईल.

                  रवींद्र चौधरी, तालुका वैद्यकीय                         अधिकारी

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये