महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुक-२०२४ च्या अनुषंगाने आंतरजिल्हा सिमेवर प्रतिबंधीत सुगंधित तंबाखुने भरलेला ट्रकसह ३५ लाखाचा माल जप्त
स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरची कामगिरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुक -२०२४ च्या अनुषंगाने जिल्हयात दारुबंदी, जुगार प्रतिबंध, प्रतिबंधीत सुगंधित तंबाखु तसेच इतर अवैध धंद्यावर कार्यवाही करणेकामी पोलीस स्टेशन सावली परिसरात स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथील अधिकारी व अंमलदार पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदार यांचेकडुन एक पांढ-या रंगाचा आयशर क्रमांक सी.जी.०७-सीक्यु-४६०२ मधुन महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधीत असलेला सुगंधित तंबाखु व पानमसाला विक्रीकरीता गडचिरोली ते चंद्रपूर अशी अवैधरित्या वाहतुक करणार असल्याचे खात्रीशिर खबर मिळाल्याने विधानसभा निवडणुक-२०२४ एस.एस.टी. चेक पोस्ट व्याहाड (बु.) ता.सावली येथे शिवलाल भगत, उपविभागीय पोलीस अधिकारी मुल, महेश कोंडावार पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर, सपोनि दिपक कांक्रेडवार, पोउपनि संतोश निंभोरकर, पोहवा/चेतन गज्जलवार, पोहवा/नितेश महात्मे, पोअं/किशोर वैरागडे, पोअं/अमोल सावे, पोअं/प्रफुल्ल गारघाटे, चापोअं/प्रमोद डंभारे यांनी राज्य उत्पादन शुल्क चंद्रपूर येथील कर्मचारी यांचेसह नाकाबंदी करुन नमुद संशयीत वाहनास चेक केले असता त्यामध्ये तारेच्या बंडल खाली लपवुन ठेवलेला महाराष्ट्र मध्ये प्रतिबंधीत असलेला मजा १०८ सुगंधित हुक्का शिशा तंबाखुचे २०० ग्रॅम वजनाचे १६८० बॉक्स, ५० ग्रॅम वजनाचे १८०० बॉक्स एकुण किंमत १९,९३,८००/- रु. व जप्त वाहन किं. १५,००,०००/- रु. असा एकुण ३४,९३,८००/- रु.चा माल पंचनामा कार्यवाही करुन जप्त करण्यात आला आहे.
आरोपी वाहन चालकांविरुध्द पोस्टे सावली येथे अपराध क्रमांक २३३/२०२४ कलम ३० (२), (अ), २६ (२), (i) २६(२)(iv), ५९ अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६, सहकलम २२३, २७५, १२३ भारतीय न्याय संहिता-२०२३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असुन पुढील तपास सपोनि दिपक कांक्रेडवार स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर हे करीत आहे.
सदरची कार्यवाही श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, रिना जनबंधु अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर, शिवलाल भगत उपविभागीय पोलीस अधिकारी मुल यांचे मार्गदर्शनात महेश कोंडावार पोलीस निरीक्षक, सपोनि दिपक कंाक्रेडवार आणि स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथील अंमलदारांनी केली आहे.