ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सिंदखेड राजा येथे सर्व नोडल अधिकारी व कर्मचाऱ्यांची सभा संपन्न 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता निवडणूक कार्यक्रम घोषित केला असून दिनांक 15 ऑक्टोबर 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे त्या अनुषंगाने 24 – सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातील सर्व नोडल अधिकारी तसेच सर्व कर्मचारी यांची आज दिनांक 23 ऑक्टोबर 2024 रोजी आढावा बैठक पंचायत समिती सभागृह सिंदखेडराजा येथे मा.निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

आजच्या बैठकीमध्ये मा. खडसे यांनी विधानसभा निवडणुकीच्या सर्व बाबींचा आढावा बैठकीमध्ये घेतला. प्रत्येक कर्मचाऱ्यांनी आपापली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडून, विधानसभा निवडणुकीला प्राधान्य देऊन प्रक्रिया पूर्ण करावी यासाठी जमलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विधानसभा निवडणूक 2024 ही यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सर्व अधिकारी/ कर्मचाऱ्यांनी आपापली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडावी असे प्रा. खडसे यांनी सर्वांना आवाहन केले.

 निवडणूकिसाठी लागणारे साहित्य तसेच पोलिंग बूथ वर लागणारे साहित्य या सर्वांचा आढावा घेऊन कोणतेही साहित्य कमी पडणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना संबंधित सेल च्या नोडल अधिकारी यांना करण्यात आल्या.

मा. खडसे यांनी आचारसंहितेचे पालन करताना कोण कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले, सर्व निवडणुकीतील कर्मचारी / अधिकाऱ्यांकडून कोणतीही चूक होऊ नये याची दक्षता घेण्याचे सुद्धा सर्वांना आवाहन केले तसेच आचारसंहितेचे पालन करून योग्य प्रकारे आपापली कामे कशी करावी यासाठी मार्गदर्शन केले.

विधानसभा निवडणुकीला प्राधान्य देऊन सर्व प्रक्रिया यशस्वी रित्या पार पाडण्याचे आवाहन केले.

 आजच्या बैठकीला मा.तहसीलदार सिंदखेड राजा अजित दिवटे, मा. गटविकास अधिकारी देऊळगाव राजा मुकेश माहोर,निवडणूक नायब तहसीलदार मनोज सातव, निवडणूक नायब तहसीलदार देऊळगावराजा प्रवीण घोटकर, नायब तहसीलदार सिंदखेडराजा अस्मा मुजावर, नायब तहसीलदार सिंदखेडराजा श्री. प्रवीणकुमार वराडे, नायब तहसीलदार देऊळगाव राजा सायली जाधव,. नायब तहसीलदार देऊळगाव राजा प्रांजल पवार, तसेच सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.प्रसारमाध्यम प्रकाश शिंदे व संजय सोनुने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये