महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे नागरीक त्रस्त
महिलांनी दिले निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
बाजार वार्ड भद्रावती येथील नागरिक विद्युत विभागाच्या गलथान कारभारामुळे त्रस्त आहे. मागील सहा महिन्यापासून वीज होल्टेज कमी जास्त होत असल्यामुळे बाजार वार्ड भद्रावती येथील नागरिकांच्या घरातील फ्रिज, वाशिंcग मशीन, पाण्याची मोटार, अशा विद्युत उपकरणांमध्ये बिघाड होऊन नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. महावितरणच्या गलथान कारभाराच्या विरोधात 20 मे ला माननीय उपकार्यकारी अभियंता महावितरण कार्यालय भद्रावती येथे धडक देऊन. बाजार वार्डातील रोहित्र दुरुस्त करून रोहित राज्य क्षमता वाढवून देणे विज होल्टेज कमी झाल्यामुळे नुकसान झालेल्या उपकरणाची भरपाई म्हणून ग्राहकांना आर्थिक स्वरूपात मदत देण्यात यावी अशी आग्रहाची विनंती केली.
निवेदन दिल्यानंतर एक आठवडा झाला तरी महावितरण कार्यालय भद्रावतीने ठोस पाऊल उचलले नाही तर पुढे या जिल्ह्याचे पालकमंत्री व आमदार यांच्या दालनात जावे लागेल. सदर महिलांमध्ये सौ अश्विनी नि ब्रड, विभा हक्के, नंदा झाडे, रेखा सातपुते, विद्या पवार, ममता सातपुते, चंद्रकला खिरटकर, रुखमा बोंडे, मंगला बोधे व बाजारवाड्यातील इतर महिलांचा समावेश होता.