शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावतीचे बाक्सिंग खेळाडू विभाग स्तरावर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
क्रीडा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय बाक्सिंग क्रीडा स्पर्धा चंद्रपूर जिल्हा क्रीडा संकुल मध्ये २० आक्टोबर २०२४ ला आयोजित करण्यात आले. यात बॉक्सिंग क्रीडा प्रकारात शिंदे कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी भद्रावती येथील तीन खेळाडू विविध वजन गटात जिल्हा स्तरावर अव्वल येत विभागावर आपले स्थान निश्चित केलेले आहे.
या झालेल्या जिल्हास्तरीय बाक्सिंग क्रीडा स्पर्धेत यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, चिचोर्डी, भद्रावतीचे १७ वर्ष गटातील खेळाडू अयान शेख, शिवकुमार तोडेकर व महेश आडे हे खेळाडू या स्पर्धेमध्ये विजयी झाले. हे खेळाडू आता नागपूर विभागातील होणाऱ्या या क्रीडा स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
विजयी झालेल्या खेळाडूंचे भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे, सचिव डॉ कार्तिक शिंदे, सहसचिव डॉ विशाल शिंदे, प्राचार्य डॉ जयंत वानखेडे, क्रीडा शिक्षक रमेश चव्हाण, डॉ. सुधीर मोते, डॉ. ज्ञानेश हटवार, माधव केंद्रे, किशोर ढोक, डॉ. प्रशांत पाठक, भीष्माचार्य बोरकुटे, कमलाकर हवाईकर, शुभम सोयाम, भद्रावती बाक्सिंग कोच लता इंदुरकर तसेच शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.