ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैध विदेशी दारु विक्रेता आरोपीवर गुन्हा दाखल

सेलू पोलीस ठाण्याची धडक कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 29/07/2026 रोजी मुखबीर यांचेकडून अवैधरित्या देशी-विदेशी दारू विक्री बाबत मिळालेल्या माहीती वरून पोलीस स्टेशन सेलू हठीतील मौजा झडशी येथे राहणारा रविशंकर महावीर जैस्वाल यावेवर प्रौरेड कारवाई केली असता तो त्याचे राहते घरी अवैधरित्या देशी-विदेशी दारु बाळगुन विक्री करतांना मिळून आल्याने त्याचेवर कारवाई करुन त्याचे घरझडती मध्ये ऑफिसर चॉईस कंपनीच्या 180 एम. एल. त्या 210 निपा जु.कि. 63,000/- रु. चा मुद्देमाल मिळून आल्याने पोलीस स्टेशन सेलू येथे दाखल गुन्ह्यातील आरोपी नामे रविशंकर महावीर जैस्वाल, वय 68 वर्ष स. झडशी व विदेशी दारूचा पुरवठा करणारा अमर दहेकर, रा. वर्धा यांचे विरुध्द दारूबंदी कायद्यान्वये कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आले आहे.

तसेच सेलू पोलीसांनी सदर आरोपीवर वर जमुठ प्रमाणे गुन्हे दाखल करुन अवैध दारू विक्रेते आरोपींना स्पष्ट संदेश दिला आहे की, यापुढे त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे दार विक्रेते आरोपीतां मध्ये खळबळ उडाली असून अवैध दारु विक्रेत्यांविरुध्द अजुनही कारवाई करण्याकरीता सेलू, पोलीस प्रयत्नशील आहेत.

सदरची कारवाई श्री. सौरभ कुमार अग्रवाल पोलीस अधिक्षक सा. वर्धा, श्री. सदाशिव वायामारे अपर पोलीस अधिक्षक सा. वर्धा, श्री. सुनिल महाडिक उपविभागीय पोलीस अधिकारी, यांचे मार्गदर्शनात श्री. पंकज वाघोडे सपोनि ठाणेदार पो. स्टे. सेलू, पो. उपनि, उमेश उमले, पोलीस अमंलदार ज्ञानदेव वनवे यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये