Sudarshan Nimkar
गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हयात होणारे अपघात कमी करण्यासाठी वाहतुक पोलीस विभागतर्फे विशेष मोहीम

एकुण ८०६ वाहन धारकांवर कार्यवाही ; ३ लाख ९८ हजारावर आकारण्यात आला दंड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा जिल्हयात होणारे अपघात कमी करण्यासाठी तसेच वाहतुक नियमांचे नागरिकांनी पालन करावे याकरिता वर्धा जिल्हा वाहतुक पोलीस विभागतर्फे संपुर्ण वर्धा जिल्हयात दिनांक 13/06/2023 पासुन विशेष मोहीम राबवली जात आहे. त्याअनुशंगाने दिनांक 13/06/2023 रोजी विशेष मोहीम दरम्यान संपुर्ण जिल्हयात 458 विना हेल्मेट धारकांवर, 212 विना सिटबेल्ट धारकांवर, 09 दारू पिवुन वाहन चालविणा-यांवर व ईतर मोटर वाहन कायदानुसार एकुण 806 वाहन धारकांवर मोटर वाहन कायदा नुसार कार्यवाही करण्यात आली असुन त्यामध्ये 3,98,100 रूपये दंड आकारण्यात आला आहे. तसेच सदर विशेष मोहीम दररोज संपुर्ण वर्धा जिल्हयात राबविण्यात येणार असुन वर्धा पोलीस दलातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी विना हेल्मेट मोटर साईकल, विना सिटबेल्ट चारचाकी वाहन तसेच दारू पिवुन वाहन चालवु नये. वाहतुकीचे नियमनांचे पालन करावे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये