ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महावीर इंटरनॅशनलच्या विभागीय संघटकपदी प्रकाश खजांची यांची निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार

सावली येथील महविर इंटरनॅशनल संघटनेचे माजी अध्यक्ष प्रकाश खजांची यांची २०२३ -२०२५ या कालावधी करिता विभागीय संघटकपदी निवड करण्यात आली.

महावीर इंटरनॅशनल संघटनेच्या माध्यमातून सावली तालुक्यात अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात.विनामूल्य मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन करून रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी पाठविण्याचे कार्य मागील अनेक वर्षापासून सुरू आहे.तसेच वर्षभरामध्ये आरोग्य तपासणी शिबिर,जयपूर फुटच्या माध्यमातून ज्यांचे हात आणि पाय गेलेले आहेत त्यांना विनामूल्य लाऊन देण्याचे काम महावीर इंटरनॅशनल सेंटरच्या माध्यमातून केले जाते.

सावली येथील प्रकाश खजांची यांची महावीर इंटरनॅशनल संघटनेच्या विभागीय समन्वयक पदी निवड झाल्याने सावली शाखेच्या वतीने त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.त्याप्रसंगी महावीर इंटरनॅशनल संघटनेचे अध्यक्ष मनोज ताटकोंडावार, सचिव राहुल मेरुगवार,संतप्रकाश शुक्ला, प्रा.अरुण राऊत,राजेश रक्षमवार,किशोर संगीडवार, अशोक पोटवार,अजय पोटवार,प्रफुल बुट्टे,अजय पोहनकर,जगदीश बनसोड,रवींद्र ताटकोंडावार,प्रा.शेखर प्यारमवार,विनोद बांगरे,प्रवीण झोडे,महेश चौधरी,किरण आकुलवार,अमोल तिगलवार यांची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये