ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माता महाकालीच्या शोभायात्रेने महोत्सवाला सुरवात

चांदा ब्लास्ट

आज जैन मंदिर येथून निघालेल्या शोभायात्रेने माता महाकाली महोत्सवाला सुरवात झाली आहे. सराफा असोसिएशनच्या वतीने ही शोभायात्रा काढण्यात आली होती. जैन मंदिर येथून शोभायात्रेला सुरवात झाली. शोभायात्रा आमदार किशोर जोरगेवार यांच्या निवास्थानी पोहल्यानंतर आ. जोरगेवार यांनी सपत्निक दर्शन घेतले.

  पाच दिवस चालणार असलेल्या श्री माता महाकाली महोत्सवाला आज पासून सुरवात झाली आहे. सकाळी 9 वाजता सराफा असोशिएशनच्या वतीने जैन मंदिर येथुन शोभायात्रा काढली होती. या शोभायात्रेत माता महाकालीची चांदीची उत्सव मुर्ती ठेवण्यात आली होती.

सदर शोभायात्रा शहराच्या मुख्य मार्गाने होत आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी दाखल झाली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सहपत्नीक मातेची पूजा करुन शोभायात्रेत सहभाग घेतला. सदर शोभायात्रा महाकाली महोत्सव पेंडालात पोहचल्या नंतर मुर्तीची विधीवत प्राणप्रतिस्थापना करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये