गडचांदुर वासियांनी प्रथमच अनुभवला माता महाकाली महोत्सवाचा
विविध धार्मिक कार्यक्रमाची मेजवानी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- श्रीतेज प्रतिष्ठान व माता महाकाली महोत्सव समिती यांचे संयुक्त विद्यमाने भव्य शोभायात्रा व भक्ती संगीत कार्यक्रमाचे शहरात आयोजन करण्यात आले होते. २४ व २५ सप्टेंबर रोजी नगरात विविध धार्मिक अधिष्ठान झाले.२४ सप्टेंबर ला सकाळी नगरातुन पदयात्रा काढण्यात आली.यावेळी संपुर्ण गडचांदुर शहर भक्तिमय झाले होते.
शोभायात्रेचे विविध ठिकाणी स्वागत करण्यात आले.यात्रा मार्ग रांगोळ्यांनी सजलेला होता.
कृषी उत्पन्न बाजार समिती पासुन सुरु झालेल्या पदयात्रेची विठ्ठल मंदिर येथे सांगता झाली.
यावेळी कोरपणा व जिवती तालुक्यातील भाविक भक्त मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी झाले.
विशेषत: जिवती पहाडावरील भजण मंडळींची उपस्थिती विशेष होती.
यावेळी ९९९ मातेच्या भक्त महिलांना पवित्र ओटी देऊन सन्मानित केले.सायंकाळी भक्ती संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.झी टिव्ही सारेगामापा कलाकारांनी भक्ती संगीताव्दारे उपस्थित भक्तगणांना मंत्रमुग्ध केले.मध्यंतरी पावसाचा व्यत्यय आला मात्र कालांतराने नियोजीत कार्यक्रम पुर्ववत चालला.
यावेळी केंद्रीय ओबिसी आयोग अध्यक्ष हंसराज अहिर,चंद्रपूर खासदार प्रतिभा धानोरकर, चंद्रपूर आमदार किशोर जोरगेवार,माजी आमदार संजय धोटे,माजी आमदार सुदर्शन निमकर,भाजपा नेते प्रकाश देवतळे,राष्ट्रवादी नेते आबिद अली, युवा मोर्चा प्रदेश नेते आशिष देवतळे,अजय जयस्वाल, चंद्रकांत वासाडे,बलराम डोगरानी, तुषार सोम,नामदेव डाहुले,सविता डांधरे, मिलिंद गंप्पावार,राज शास्त्रकार,सायली येरणे, सुरेश केंद्रे यांचे सह भागातील गणमान्य मान्यवर उपस्थित होते.
चंद्रपूर आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थित भक्तगणांना संबोधित केले.
महाकाली आईचा आशिर्वाद सदैव गडचांदुरकरांच्या पाठिशी आहे.
समाजासाठी नेहमी सकारात्मक उर्जा प्रदान करणारा सेवक निलेश ताजणे यांचे माध्यमातून मिळाला हे सुध्दा आईची महिमा आहे हा नामोल्लेख त्यांनी केला.यावेळी उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यांना साद दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिहर खरवडे गुरूजी यांनी केले तर आभार प्रदर्शन तुळशीराम पानघाटे यांनी केले.
२५ सप्टेंबर रोजी स्थानिक विठ्ठल रखुमाई मंदिर येथे सकाळी होम हवन करून मातेची आराधना करण्यात आली.यावेळी महाप्रसाद वितरण करून महाकाली मातेच्या रथाला निरोप देण्यात आला.
चंद्रपुर माता महाकाली महोत्सव समितीने हा रथ दर्शनासाठी पाठविला होता.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीतेज प्रतिष्ठान व माता महाकाली आयोजन समितीने विशेष सहकार्य केले.