ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विद्यार्थ्यांनी प्रगतीसाठी जिद्द आणि चिकाटी ठेवावी – प्रा. विजय आकनुरवार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात प्रगती साधायची असेल तर खूप अभ्यास करणे महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांनी अभ्यास करतांना आत्मविश्वास, जिद्द व चिकाटी ठेवावी व अभ्यासाचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्राचार्य विजय आकनुरवार यांनी केले ते गडचांदूर येथिल आदिवासी मुला मुलींचे शासकीय वसतिगृहात आयोजित केलेल्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे नियोजन व वेळेचा सदुपयोग या विषयावर मार्गदर्शन करताना बोलत होते.

सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बिरसा मुंडा यांच्या फोटो ची विधिवत पूजा करून व माल्यार्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून सेवानिवृत्त उपप्राचार्य विजय आकनुरवार हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त शिक्षक लक्ष्मण खुठेमाटे, महिला गृहपाल कु सुनीता शिंदे,पुरुष गृहपाल धोंडिराम गुठे उपस्थित होते या वेळी लक्ष्मण खुंठेमाटे व धोंडीराम गुठे यांनीही मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालन कु सोनाली कुडसंगे यांनी केले तर आभार कु अस्विनी जंभोड यांनी केले कार्यक्रमाला वसतिगृहातील विध्यार्थी,शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये