Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यांच्या आश्वासना नंतर अंपग बांधवाचे आदोलन मागे !

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 वर्धा- जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील स्थानिक हिंगणघाट येथे कामगार नेते डॉ उमेश वावरे ( वैज्ञानिक ) यांच्या नेतृत्वात दिनाक 26 संप्टेबर पासून अंपग बांधवाच्या विविध मागण्यासाठी उपोषणाला बसले होते प्रामुख्याने हिंगणघाट मध्ये माडाचे घर अंपग बांधवाना देण्यात यावे, अंपग बांधवाना 10 हजार रूपये दरमाह देण्यात यावे आणी शासकीय नोकरीत 5% कोटा असून त्या जागा लवकरात लवकर भरण्यात यावे अशा विविध मागण्या साठी उपोषन सुरू करण्यात आले होते त्या उपोषणाला 6 दिवस पूर्ण झाल्यानंतर दि. 1 आक्टोबर रोजी शासना मार्फत उपोषणाची दखल घेवून उपविभागीय अधिकारी वंदना सावरंगपती मॅडम हिंगणघाट यांनी अपंग बांधवांच्या मागण्या मान्य करीत पुढील आदेश वरिष्ठ अधिकारी करतील असे आश्वासन देऊन उपोषन मागे घ्यावे.

अशी विनंती केली असता अंपग बांधवानी उपोषन मागे घेण्यात आले असून व आश्वासन पूर्ण न झालास पून्हा आदोलन सुरू करू असे मत दिव्यांग बांधवानी मांडले आहेत त्यावेळी उपस्थिति असलेले अपंग बांधवांवर मनिष कांबळे,चारू आटे, प्रविण कावळे, अमरसिंह गगनवार, आकाश बोकरे,प्रफुल्ल ऊके, मनोज बोटकवार, प्रफुल शेंन्डे, हसन अली, नदिम पठान, मनर्कना थुल, सूनदा जामूनकर, मिनाबाई धनरे, गणेश मगरूड बालू लाल लोंखडे कलावती सहारे, बरकत अन्सारी,देवीदास लोहकरे, तारकेश रामटेके, सुरेश भरणे, राजू खानकूरे व इतर कार्यकर्ते उपस्थिति होते

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये