Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिक्षिकेकडून विद्यार्थ्यांना बेदम मारहाण

व्याहाड खुर्द जिल्हा परिषद शाळेतील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

सावली – तालुक्यातील व्याहाड खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत विषय शिक्षिका म्हणून कार्यरत उज्वला पाटील या शिक्षिकेने सातव्या वर्गातील विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याने उपचारकरिता दवाखान्यात भरती करण्याची पाळी आली असून पोलीस तक्रार करण्यात आली आहे.

     सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथे इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत जिल्हा परिषद शाळा आहे. आज सकाळी शाळा सुरु झाल्यानंतर शिक्षिका उज्वला पाटील हिने सातव्या वर्गातील विद्यार्थी विद्यार्थिनींना वर्गात बोलावून बेदम मारहाण केली. यात धनश्री हरिदास दहेलकर, लावण्या कुमदेव चुधरी हे जखमी झाले असून ग्रामीण रुग्णालया सावली येथे उपचार सुरु आहे.

याबाबतची तक्रार सावली पोलीस स्टेशनला केली आहे. सदर शिक्षिकेवर कारवाई करण्याची मागणी पालव वर्गाकडून होत आहे.

घडलेला प्रकार गंभीर असून योग्य ती चौकशी करून सदर शिक्षिकेवर कारवाई करण्यात येईल

   मोरेश्वर बोंडे, गटशिक्षणाधिकारी पं.स.सावली

उज्वला पाटील यांचेबाबत यापूर्वीही तक्रारी आहेत. आज विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केल्याने त्यांचेवर बडतर्फीची कारवाई करण्यात यावी.

   मनीषा जवादे,माजी पंचायत समिती सदस्य

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये