Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बाबूपेठ उड्डाणपूल सुरू होण्यापूर्वी बागला चौकात ट्रॅफिक सिग्नल सुरू करा – आ. किशोर जोरगेवार

अधिका-यांसह उड्डाण पुलाच्या कामाची पाहणी करत बागला चौकातील वाहतुकीचा आढावा

चांदा ब्लास्ट

काही दिवसांतच बाबूपेठ उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरू होणार आहे. येथील उर्वरित शिल्लक कामे जलद पूर्ण करण्यासाठी प्रशासन युद्धस्तरावर काम करत आहे. आपण सतत अधिका-यांच्या संपर्कात आहोत असे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले असून पूल सुरू झाल्यावर बागला चौकात वाहतुकीचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी येथे ट्रॅफिक सिग्नल लावा, अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा आयुक्त विपिन पालिवाल यांना दिल्या आहेत.

आज आमदार किशोर जोरगेवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, चंद्रपूर महानगरपालिका, महावितरण विभाग आणि रेल्वे विभागाच्या अधिका-यांसह पुलाची पाहणी करत उड्डाणपूल सुरू झाल्यावर वाहतुकीवर होणाऱ्या परिणामाचा आढावा घेतला. यावेळी मनपा आयुक्त विपिन पालिवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश तांगडे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता विवेक अंबुले, महावितरणचे हेडाऊ यांच्यासह रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

बाबूपेठ रेल्वे उड्डाणपुलाचे काम जलद गतीने पुढे जात आहे. यात रेल्वे विभाग, महानगरपालिका, महावितरण कंपनी, एमएमआरडीए, आणि सार्वजनिक बांधकाम विभाग समन्वय साधून उत्तम काम करत आहेत. रेल्वे पूल उतरणार असलेल्या बागला चौकातील लाइट पोल आणि इतर अडथळे दूर करण्यात आले आहेत. लवकरच हा भाग पूलाशी जोडला जाणार आहे. दोन दिवस पाऊस असल्याने काम थोडे मंदावले आहे, मात्र पुन्हा या कामाला गती देण्याची गरज असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.

उड्डाणपूल सुरू होण्याआधी येथील वाहतुकीचा आमदार किशोर जोरगेवार यांनी आढावा घेतला. बल्लारशाह, लालपेठ या भागात जाणारा नागरिक बागला चौकातून जातो, आणि हा पूलही बागला चौकात उतरणार आहे. अशा परिस्थितीत येथे वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर तोडगा काढण्यासाठी नियोजन करा आणि पूल सुरू होण्याआधीच येथे ट्रॅफिक सिग्नल सुरू करा, असे निर्देश यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा आयुक्त विपिन पालिवाल यांना दिले आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये