ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खासदार बाळूभाऊ धानोरकरांच्या निधनाने समर्पित नेता आणि दबंग खासदार गमावला – उत्तम पेचे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

काँग्रेस पक्षाचे तडफदार लढवय्ये नेते ढाण्या वाघ चंद्रपूरचे खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांच्या आकस्मिक निधनाने मन सुन्न झाले आहे. वेदांत हॉस्पिटलमधील उपचारानंतर ते पुन्हा बरे होऊन येतील असे वाटत असतानाच अचानक त्यांच्या निधनाची बातमी आली. बाळू धानोरकर यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाने सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी कार्यरत असणारा एक समर्पित नेता व आपण दबंग खासदार गमावला, कोरपणा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उत्तमजी पेचे यांनी व्यक्त केल्या आहेत.
बाळू धानोरकर यांच्या निधनावर तीव्र दु:ख व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली दिली
की, दांडगा जनसंपर्क, मनमिळावू स्वभाव संघटन कौशल्य आणि कार्यकर्त्यामध्ये मिसळणारा नेता अशी धानोरकर यांची ओळख होती. जनतेच्या प्रश्नावर जागरूक राहून ते सोडविण्यासाठी ते कटिबद्ध होते, त्यासाठी वेळप्रसंगी संघर्ष करायल ही ते तयार असायचे. ४८ वर्षांच्या अल्पवयातच त्यांनी सामाजिक कार्यकर्ता ते महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचा खासदार असा वाखाणण्यासारखा प्रवास केला. कुठलाही राजकीय वारसा नसताना प्रचंड मेहनत आणि जनतेच्या पाठिंब्याच्या बळावर एक कर्तबगार लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला होता. दोन दिवसाआधी त्यांचे वडील नारायण धानोरकर यांचे निधन झाले
होते आणि आज बाळूभाऊ धानोरकर आपल्यातून निघून गेले. धानोरकर कुटुंबावर हा दुहेरी आघात असून आमदार प्रतिभाताई धानोरकर व त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. बाळूभाऊ धानोरकर यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे.

खा. बाळूभाऊ धानोरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतांना या कठिण प्रसंगी संपूर्ण कोरपना तालुका काँग्रेस पक्ष धानोरकर कुटुंबियांच्या सोबत आहे, असे कोरपना तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष श्री उत्तम पेचे म्हणाले.
सदर भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रमात cdcc बँकेचे संचालक श्री विजयराव बावणे,श्यामजी रणदिवे,भाऊजी पाटील चव्हाण,सितारामजी कोडापे,संबाजी कोवे,विनोद नवले, रसुल पटेल इरफान भाई,मनोहर चन्ने, इस्माईल भाई, निसार भाई,रोशन आस्वले, अनिल गोंडे, प्रशांत लोडे,लछमा कुळमेथे आदी मान्यवर तथा कार्यकर्ते उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये