ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैध दारू विक्री बंद करा – चपराळा येथील महिलांचा एल्गार

निधी ग्राम संघ महिलांनी दिले ठाणेदारांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         तालुक्यातील चपराळा गावात अवैध दारू विक्री जोरात सुरू असून या दारू विक्रीमुळे गावातील सामाजिक वातावरण बिघडत चालले आहे. चपराळा येथील महिला या अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी नेहमी प्रयत्न करीत असतात. मात्र गावातील अवैध दारू विक्रेते या महिलांना शिवीगाळ करीत मारहाण करण्याच्या धमक्या देत असतात. त्यामुळे या सर्व प्रकाराला कंटाळून गावातील अवैध दारू विक्री बंद करून महिलांना संरक्षण देण्याच्या मागणीचे निवेदन गावातील निधी ग्राम संघाच्या महिलांनी भद्रावती पोलीस स्टेशन येथील ठाणेदारांना दिले आहे.

            चपराळा गावात अवैध दारू विक्रीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून या अवैध दारू विक्रीमुळे गावातील शांतता भंग होऊन गावात भांडण तंट्यांचे प्रमाण वाढले आहे. अवैध दारू विक्रीचा परिणाम गावातील युवा पिढीवर होत असून युवा पिढी दारूच्या आहारी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथील महिला या अवैध दारू विक्रीच्या विरोधात नेहमी आवाज उठवून ही अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. मात्र त्यांच्या विरोधाला न जुमानता गावात अवैध दारू विक्री जोरात सुरूच आहे. हे अवैध दारू विक्रेते या महिलांना शिविगाळ करून महाराणीची धमकी देत असल्यामुळे या महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. ही सर्व बाब लक्षात घेऊन गावातील अवैध दारू विक्रीवर आळा घालून गावातील महिलांना अवैध दारू विक्रेत्यांपासून संरक्षण द्यावे अशी मागणी ठाणेदारांना दिलेल्या या निवेदनातून गावातील महिलांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये