ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोडशी (बु ) येथील विद्युत पोल पडल्यामुळे तीन दिवसापासून अंधारात

विज खाब जैसे थे अवस्थेत ; महावितरणचे दुर्लक्ष

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.प्रमोद गिरडकर

कोरपना – शनिवारी झालेल्या वादळी पावसामुळे,कोरपना तालुक्यातील कोडशी गावातील विद्युत खांब कोसळले. त्यामुळे गावाचा संपूर्ण विद्युत पुरवठा खंडित पडला आहे. मात्र तीन दिवस उलटून ही यावर दुरुस्ती करण्यात आली नसल्याने गावकऱ्याकडून संताप व्यक्त होत आहे. तालुक्यात झालेल्या वादळी पावसामुळे कोरपना तालुक्यातील अनेक गावात महावितरण चे पोल पडले गेले. विद्युत तारा तुटल्या गेल्या. बऱ्याच गावातील विद्युत पुरवठा दुसऱ्याच दिवशी पूर्ववत सुरळीत झाला. मात्र कोडशी येथील विद्युत पुरवठा अध्याप ही सुरळीत होऊ शकला आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने असह्य उखाडा नागरिकांना उष्णतेच्या माध्यमातून जाणवत आहे. त्यातल्या त्यात वीज नसल्याने अधिकच भासली जात आहे. तालुक्यातील सर्वात जुनी विद्युत वाहिनी असलेली कोडशी परिसरातील वीज जोडणी आहे. परंतु त्याचे योग्य व्यवस्थापन केले गेले नसल्याने ही वेळ आली गेली. विद्युत अभावी गावातील अनेक कामे रेंगाळली गेली आहे. चक्की, झेरॉक्स, कोल्ड्रिंक व्यावसायिक आदीना याचा मोठा फटका बसतोय. विद्युत नसल्याने बोअरवेल चालत नसून पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण होते आहे. मोबाईल संच चार्जिंग अभावी बंद पडले गेले असून संपर्काचे साधन ठप्प पडले आहे. त्यामुळे पडलेले पोल तातडीने दुरुस्त करून विद्युत विभागाने कोडशी गावातील अंधार दूर करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होते आहे. विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त कोरपना तालुक्यातील महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ च्या कोरपना , गडचांदूर , नारांडा, कवठाला, पारडी या पाच ही उपकेंद्रातील गावातील वीज अधून मधून जातच राहत असल्याने नागरिकात संताप व्यक्त होत आहे. सद्या उन्हाळा अजून कमी झाला नसल्याने आधीच गरमिने नागरिक त्रस्त असताना विद्युत ही नागरिकाच्या सहनशीलतेचा अंत पाहत असल्याचे चित्र आहे. महावितरण ने पावसाळा लागण्या पूर्वीच झुडपाचे व्यवस्थापन केले नाही त्यामुळे तांत्रिक अडचणी निर्माण होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये