Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अंबुजा फाउंडेशनच्या वतीने पोषण सप्ताह साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

राष्ट्रीय पोषण माह अभियान अन्तर्गत आज दिनांक 25 सप्टेंबर 2024 ला अंबुजा फाउंडेशन कार्यालय उपरवाही येथे विविध विभागातील गाव पातळीवर कार्य करणाऱ्या महिला कार्यकर्ता करीता पोषण आहार स्पर्धा आयोजित केली होती.

या स्पर्धेला मार्गदर्शिका म्हणून डॉक्टर प्रीति कांबळे,आहार कंसल्टेंट चंद्रपूर तर श्री जितेंद्र बैस, सीनियर प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर, कल्पना भेंडे, प्रोजेक्ट एक्जीक्यूट अंबुजा फाउंडेशन उपस्थित होते.

अंबुजा फाउंडेशन द्वारा या महिन्यात गावा गावत आईसीडीएस, आरोग्य विभाग यांच्या सोबत गावातील महिला, शेतकरी, मुले, किशोरी मुले मुली यांचे करिता विविध कार्यक्रम आयोजित केले आहे.गावातील कुपोषण दूर करने हा या कार्यक्रमामागिल उद्देश आहे. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा उप्परवाही येथे विद्यार्थ्यांना,गावकऱ्यांना स्वच्छतेचे महत्व कळावे या दृष्टीने विचार करून शिक्षण विभागाच्या वतीने रॅली चे आयोजन शिक्षक विभाग समन्वयीका सरोज अंबागडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.

आज पोषण आहार स्पर्धेत प्रथम पारितोषिक पोर्णिमा डोईफोडे तर द्वितीय पारितोषिक कल्पना करिए आणि तृतीय पारितोषिक पोर्णिमा जाधव यांनी पटकविले. सर्व सहभागी ना पारितोषिक वितरण करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये