Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लखमापूरच्या तब्बल 100 विद्यार्थ्यांनी बचत खाते उघडले स्टेट बँकेत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

शालेय विद्यार्थ्यांना शासनाकडून वेळोवेळी ज्या योजना मिळतात त्या योजनेचा थेट लाभ आपल्या खात्यात ती रक्कम लाभ मिळवण्यासाठी शाळेने पुढाकार घेऊन एसबीआय बँकेच्या मॅनेजर सोबत चर्चा करून शाळेमध्ये येऊन बचत खात्यासाठी लागत असलेल्या कागदपत्राची पूर्तता करून एकाच वेळेस शंभर खाते शाळेतील विद्यार्थ्यांचे एसबीआय बँक लखमापुर मध्ये उघडण्यात आले.

एकाच वेळेस 100 खाते उघडण्या मागचा शाळेचा हेतू शाळे च्या व्यवहाराची पारदर्शकता दिसून येणे. शासकीय योजनेचा थेट लाभ विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करून देणे. विद्यार्थ्यांना स्वतःचे बचत खाते असल्यामुळे बँकेचे व्यवहार समजून येणे.

शासकीय ध्येयधोरणाचा आणि योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना समजून घेऊन, बँकेचे व्यवहार समजण्यासाठी अशा प्रकारचे बँक बचत खाते शाळेच्या पुढाकाराने आणि बँकेच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांना एकाच वेळेस 100 खाते उघडून देण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये