Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेतर्फे अपघात विमा क्लेम रकमेचे वाटप

चांदा ब्लास्ट

चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत पगार होणारे जिल्हयातील ११५७९ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांचा सिडीसीसी बॅक सॅलरी पॅकेज अंतर्गत प्रत्येकी रू. ३०.०० लाख चा अपघात विमा बॅकेतर्फे काढण्यांत आलेला आहे.

कोठारी शाखेतअंतर्गत पगार घेणारे कर्मवीर विदयालय, येनबोडी येथील शिक्षीका कै. सौ. बिनाताई भिमराव जिवणे यांचा दि. ०४.०४.२०२४ रोजी दुदैवाने अपघाती मृत्यु झाला. बँकेचे सिडीसीसी बँक सॅलरी पॅकेज अंतर्गत बँकेच्या प्रमुख कार्यालयांत बँकेचे अध्यक्ष श्री. संतोषसिंह रावत यांचे हस्ते कै. सौ. बिनाताई भिमराव जिवणे यांचे पती डॉ. श्री. भिमरावजी जिवणे यांना रू. ३०.०० लाख विमा क्लेम रक्कम अदा करण्यांत आली.

यावेळी बँकेचे संचालक सर्वश्री. श्री. पांडुरंगजी जाधव, श्री. प्रकाश बन्सोड व बँकेचे अधिकारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये