Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्कॉलर्स सर्च अकॅडेमी कोरपनाची मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यामध्ये उत्कृष्ट कामगिरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

कोरपणा :- महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग द्वारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना अंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 हे अभियान महाराष्ट्र राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांकरिता राबविण्यात येत असून या अभियानात सर्च फाउंडेशन चंद्रपूर द्वारा संचालित 20 वर्षांपासून ग्रामीण, आदिवासी, शेतकरी, गरीब वर्गातील मुलांना उत्र्कृष्ट दर्जाचे शिक्षण देणारी कोरपना परिसरातील पहिली नामांकित इंग्रजी माध्यमाची शाळा आहेत.

कोरपना तालुक्यातील नर्सरी ते इयत्ता 12 वि विज्ञान व 100% निकालाची परंपरा कायम ठेवणारी नामांकित निवासी-अनिवासी स्कॉलर्स सर्च अकॅडेमी , कोरपना या शाळेने तालुक्यातून तृतीय क्रमांक पटकावला आहे . महाराष्ट्र शासनाच्या इंग्रजी माध्यम निवासी शाळा योजनेत नामांकित मध्ये सुध्दा शाळेचा समावेश आहेत. सहा एकरच्या निसर्गरम्य परिसरात संस्थेने अनेक शालेय व भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून विद्यार्थांना मौलिक, विज्ञाननिष्ट, पुरोगामी विचार व कौशल्य युक्त बनविणे, सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास हे संस्थेचे ध्येय आहेत. याच ध्येयातून शाळेने अनेक उपक्रम राबविले आहेत.

    विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास शालेय प्रशासनाचे बळकटीकरण व शैक्षणिक या घटकावर आधारित महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 या अभियानात विद्यालयाने सहभाग घेत डिजिटल शाळा , पायाभूत सोयीसुविधा, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रगती व व्यक्तिमत्व विकास, अध्ययन अध्यापन प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, परसबाग विकास, स्वयंम पोर्टल,विद्याजली पोर्टल, एन एस क्यू एफ, एचपीसी, भाषा प्रयोगशाळा,आरोग्य तपासणी,आपत्ती व्यवस्थापन,इको क्लब,क्रीडा सुविधा शैक्षणिक साधन समृद्धी , महावाचन, आनंददायी शनिवार, स्वच्छता, स्पर्धा परीक्षा,भाषा विषयक क्षमता अशा अनेक घटकावर उत्कृष्ट काम केल्यामुळे विद्यालयाने कोरपणा तालुक्यातून तृतीय क्रमांक पटकावला आहे.

शाळेच्या या यशाबद्दल शाळेचे संस्थापक- अध्यक्ष इंजि. दिलीप झाडे, संस्थेच्या उपाध्यक्ष सौ. कुंदा दिलिप झाडे,सहसचिव प्रा.डॉ.कविता हिंगाने,पंचायत समिती कोरपना चे गटशिक्षणाधिकारी सचिनकुमार मालवी, शिक्षण विस्तार अधिकारी कल्याण जोगदंड यांनी अभिनंदन केले.

सदर अभियान यशस्वीते साठी शाळेचे प्राचार्य राहुल उलमाले, उपप्राचार्या करिष्मा साटोणे, प्रणाली खडसे, सारिका ढोंगाले,पूजा थेरे, भावना मोरे, दिव्या शेंडे, शाम वाघमारे,संकेत साखरकर, छबन पेरके, विशाल मालेकार, हर्षल तडस, सचिन जिवतोडे, प्रांजली मोहितकार, उज्वला वडस्कर, नेहा हंसकर, तनुजा टोंगे, रुपाली बोरीकर, प्रियंका उपरे, गौरव कौरासे, उज्वला जाधव, मिसबाह काझी तसेच विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये