Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूर परिमंडळ अंतर्गत १ हजार १५२ ग्राहकांनी प्रधानमंत्री सूर्य घर मोफत योजनेचा घेतला लाभ

चांदा ब्लास्ट

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला चंद्रपूर परिमंडळांतर्गत उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत चंद्रपूर परिमंडळ अंतर्गत १ हजार १५२ ग्राहकांनी योजनेचा लाभ घेत घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवून स्वत:ची वीज स्वत: तयार करण्यास सुरुवात केली आहे. पर्यायाने ते विजेबाबत स्वावलंबी झाले आहे.

      या योजनेत केंद्र सरकारतर्फे तीन किलो वॅट क्षमता पर्यंतच्या प्रकल्पांसाठी ग्राहकांना ७८ हजार रुपयांपर्यंत सबसिडी मिळते. ही योजना फेब्रुवारी महिन्यात सुरु झाली. सौर प्रकल्पांतून ग्राहकाच्या गरजेपेक्षा अधिक वीज निर्मिती झाल्यामुळे वीज बिल शुन्य होते. शिल्लक वीज महावितरण विकत घेते. निवासी घरघुती कुटुंबांसाठी प्रति किलोवॅट ३० हजार रुपये अनुदान २ किलोवॅटपर्यंत मिळते. ३ किलोवॅटपर्यंत अतिरिक्त एक किलोवॅट क्षमतेसाठी १८ हजार रुपये अनुदान मिळते. ३ किलोवॅट पेक्षा मोठ्या सिस्टीमसाठी एकूण अनुदान ७८ हजार रुपयापर्यंत मर्यादित आहे.

रूफटॉप बसवणाऱ्या एजन्सीजसाठी महावितरणने मीटर चाचणीची प्रक्रिया अतिशय सुलभ आणि जलद केलेली आहे. त्याचप्रमाणे १० किलोवॅटपर्यंत क्षमतेसाठी त्वरित स्वयंचलित मंजुरी देण्यात येत आहे. या योजनेसाठी सवलतीच्या दरात बँकेकडून कर्ज उपलब्ध होते. पीएम-सूर्यघर योजनेच्या संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर प्रकल्प बनवण्यासाठी ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार विक्रेता निवडता येतो. प्रकल्प बसविल्यानंतर अनुदान थेट ग्राहकांच्या खात्यात जमा केले जाते. वीज ग्राहकांना https://www.pmsuryaghar.gov.in/ या संकेत स्थळावर योजनेची सर्व माहिती उपलब्ध आहे. प्रधानमंत्री सूर्य घर मोफत योजना छतावर सोलर बसविलेल्या चंद्रपूर परिमंडळातील ग्राहकांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात जास्त म्हणजे ८१९ ग्राहकाचा समावेश आहे त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील ३३३ ग्राहकाचा समावेश आहे.

     उपरोक्त योजनेचा जास्तीत जास्त ग्राहकांनी फायदा घेण्याकरिता विविध प्रसिद्धी माध्यमाद्वारे आवाहन चंद्रपूर परिमंडळातील मुख्य अभियंता श्री. हरीश गजबे यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये