ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चांदा पब्लिक स्कूल येथे स्व. श्री संजय श्रीहरी जिवतोडे यांना भावपूर्ण आदरांजली.

चांदा ब्लास्ट

चांदा पब्लिक स्कूल येथे दि. 22/03/2025 ला शाळेचे संस्थापक श्री. संजय श्रीहरी जिवतोडे यांचा 55 वा जन्मदिन साजरा करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जिवतोडे, प्राचार्या आम्रपाली पडोळे, सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात ‘या विश्वाची आम्ही लेकरे…’ या गीतासमवेत संजय श्रीहरी जिवतोडे यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून करण्यात आली.

कुशल संघटक व नेतृत्व निपून असलेले श्री. संजय श्रीहरी जिवतोडे यांनी अतिशय कमी वयातच लोकप्रिय युवानेते म्हणून कायमस्वरुपी लोकांच्या मनात आपले स्थान तयार केले होते. शैक्षणिक क्षेत्रात होणारे नवनवीन बदल लक्षात घेऊन चांदा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना त्यांनी उच्च दर्जाच्या शैक्षणिक सुविधांची संधी प्राप्त करुन दिली.

श्री. संजय श्रीहरी जिवतोडे यांच्या जन्मदिवसाप्रसंगी शाळेतील विद्यार्थी मंत्रीमंडळातील विद्यार्थ्यांनी सामुदायिक सेवा उपक्रमाच्या अंतर्गत डेबू सावली वृद्धाश्रमाला भेट देऊन धान्य वितरण केले. या उपक्रमात शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांने आपला खारीचा वाटा दिला. आजच्या युवा पिढीला संवेदनशील बनवणे, त्यांच्यात सहानुभूती आणि करुणेची मूल्ये बिंबवणे हा या उपक्रमामागचा उद्देश आहे.

यावेळी शिक्षिका जास्मिन हकीम यांनी संजय सरांच्या स्मृतींना उजाळा दिला. शाळेच्या प्राचार्या आम्रपाली पडोळे या श्री. संजय श्रीहरी जिवतोडे यांना भावपूर्ण आदरांजली देत म्हणाल्या की, संजय सर आमचे प्रेरणास्थान आहे. त्यांचे कार्य सदैव आमच्यासाठी प्रेरणादायी ठरेल.

संचालिका श्रीमती स्मिता संजय जिवतोडे यांनी संजय सरांच्या गतस्मृतींना उजाळा दिला व म्हणाल्या, त्यांनी बघितलेल्या स्वप्नांची पूर्तता करण्यात आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहू व त्यांच्या स्वप्नांना मूर्त रूप देऊ.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अन्वेषा रामगावकर व विभावरी भोंगळे या विद्यार्थिनींनी केले तर आभार प्रदर्शन कार्यक्रम प्रमुख प्रांजली गोवारदिपे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता शाळेचे पर्यवेक्षक महेश गौरकार, फहीम शेख, लता खनके, यांचे सहकार्य लागले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये