ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रामगिरी महाराज व आमदार नितेश राणेंवर कारवाई करा

मुस्लिम समाजातर्फे मूक मोर्चा काढून ठाणेदारांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

       समाजामध्ये आपल्या वक्तव्याने तेढ निर्माण करणाऱ्या रामगिरी महाराज व आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी शहरातील मुस्लिम समाजातर्फे मूक मोर्चा काढून ठाणेदारांना निवेदन सादर करण्यात आले. सदर मूक मोर्चा जामा मस्जिद चौकातून पोलीस स्टेशन पर्यंत काढण्यात आला. मुस्लिम समाजाच्या सहवासात राहणारे हिंदू सुरक्षित नसल्याचे विधान रामगिरी महाराज यांनी करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

त्याचप्रमाणे इस्लाम धर्माचे संस्थापक यांचे विरोधात अपमान जनक वक्तव्य केले. रामगिरी महाराजांच्या या वक्तव्याचे समर्थन करीत आमदार नितेश राणे यांनी रामगिरी महाराजांवर कारवाई केल्यास मज्जिद मध्ये घुसून मारण्याची भाषा वापरली. त्यामुळे मुस्लिम समाजात आक्रोश निर्माण झाला आहे. त्यामुळे रामगिरी महाराज व आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. सदर मूक मोर्चात शहरातील समस्त मुस्लिम बांधव सहभागी झाले होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये