ताज्या घडामोडी

विराआसद्वारे २८ सप्टेंबरला चंद्रपूर जिल्ह्यात नागपूर कराराची होळी

चांदा ब्लास्ट

विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने दिनांक २८ सप्टेंबर २०२५, रोज रविवार ला दुपारी १२ वाजता चंद्रपूर जिल्ह्यात नागपूर कराराची होळी करण्यात येणार आहे. याच दिवशी ७२ वर्षापूर्वी दि. २८ सप्टेंबर १९५३ रोजी नागपूर करार होऊन अकरा मुद्द्यांचे आधारावर विदर्भ महाराष्ट्रात सामिल झाला होता.

मात्र त्या करारातील अटी व शर्तींचे पालन सरकारने केले नाही. त्यामुळे मुबलक पाणी, सुपिक जमीन, खनिजे, वनसंपदा असा सर्वसंपन्न असलेला विदर्भ प्रदेश विकासाचे बाबतीत मागे तर राहिलाच उलट शेतकरी आत्महत्या, प्रदुषण, कुपोषण, बेरोजगारी, गरीबी, नक्षलवाद, निधीचा प्रचंड अनुशेष यामुळे महाराष्ट्रात गेल्यावर विदर्भाचा प्रचंड बट्ट्याबोळ झाला. त्यामुळे हा नागपूर करार ज्या दिवशी झाला, त्या दिवशी विदर्भ राज्य आंदोलन समिती निषेध व्यक्त करून या नागपूर कराराची होळी करण्याचे आंदोलन करणार आहे.

चंद्रपूर येथे जेटपूरा गेट वरील गांधी पुतळ्यासमोर, राजुरा येथे संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर, गोंडपिपरी येथे गांधी चौकात, कोरपना येथे बस स्थानक चौक आणि जिवती येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर नागपूर कराराच्या प्रतींची होळी करण्यात येणार आहे.

विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष माजी आमदार ॲड. वामनराव चटप, जिल्हाध्यक्ष किशोर दहेकर, अंकुश वाघमारे, निळकंठराव कोरांगे, कपील इद्दे, मितीन भागवत, मारोतराव बोथले, मुन्ना आवळे, मुन्ना खोब्रागडे, पपीता जुनघरी, अरूण सातपुते, किशोर दांडेकर, अनिल दिकोंडावार, अरूण वासलवार, शालिक माऊलीकर, रमेश नळे, धनराज आस्वले यांचेसह अन्य नेते या आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत. आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये