Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भक्तीपीठ महामार्गाचे माध्यमातून शासनाच्या डोळ्यात धुळफेक करून कोट्याधीश होण्याचे अनेकांचे स्वप्न भंगले 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 राज्य रस्ते विकास महामंडळाने सिंदखेड राजा ते शेगाव दरम्यान भक्तीपीठ महामार्ग प्रस्तावित केला समृद्धी महामार्गाचा विस्तार करण्यासाठी हा महामार्ग प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला होता या महामार्ग प्रकल्पामुळे समृद्धी महामार्गावरून तीर्थक्षेत्र शेगावला अति जलद वेगात जाता येणार होते हा 109 किलोमीटर लांबीचा भक्तीपीठ महामार्ग चार पदरी राहणार होता या प्रकल्पाच्या संरेखनास सुद्धा राज्य सरकारने मान्यता दिली होती तसेच भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्याची तयारी झाली होती मात्र आता या प्रकल्पाचे भूसंपादन देखील रद्द करण्याचा निर्णय झाल्याने या भक्तपीठ महामार्गत ज्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमीनी जाणार होत्या त्यापैकी अनेक शेतकऱ्यांनी शक्कल लढवत अल्पावधीतच कोट्याधीश होण्याची स्वप्न रंगवली व अनेकांनी आपल्या पडीक जमिनीत रातोरात मोठ मोठया यंत्राच्या सहाय्याने खड्डे खोदून त्यामध्ये दहा फूट उंचीचे विविध फळ फळांचे झाडे लावली तर अनेक शेतकऱ्यांनी 500 ते 1000 फूट खोलीपर्यंत बोरवेल घेऊन ठेवल्या कारण जेव्हा या मार्गातील त्या त्या जमिनीचा सर्वे होईल त्यामध्ये आपली शेत जमीन बागायती दाखवून या बगीच्या मध्ये दहा वर्षांपूर्वीच आम्ही फळबाग लागवड केली असे भासवण्याचा व त्या नापीक शेत जमिनीची किंमत कोट्यावधी ने वाढवून रातोरात आपण करोडपती होऊ अशी स्वप्न रंगवली अनेक शेतकऱ्यांनी हे करत असताना दहा फूट उंचीचे एक हजार रुपयांमध्ये मिळणारे आंबा चिकू पेरू केशर आंबा संत्रा मोसंबी अंजीर चे रोपे अव्वाच्या सव्वा भाव देऊन खरेदी केले व रातोरात आपली नापीक जमीन बागायती केल्याचा देखावा तयार केला आता राज्य सरकारने हा भक्ती पीठ महामार्ग रद्द केल्याने अनेक शेतकऱ्यांचे करोडपती होण्याचे स्वप्न भंगले असून त्यांनी जो अव्वाच्या सव्वा खर्च करून बसले आहेत आता त्यांच्याकडे रडण्याला मजुर सुद्धा नाही

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये