Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडी

जिवंत विद्युत तार तुटल्याने चार शेतकऱ्यांचा मृत्यु – शेतात काम करीत असतानाच यमराजने चौघांना गाठले

तीन शेतकरी अत्यवस्थ - चंद्रपूर जिल्ह्यातील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी

नंदु गुड्डेवार, ब्रम्हपुरी

ऐन गणेशोत्सवात चंद्रपूर जिल्ह्यात घडलेल्या भिषण अपघातात विद्युत प्रवाहाशी संपर्क आल्याने शेतात काम करीत असलेले चार शेतकरी मृत्युमुखी पडले असुन पाचवा शेतकरी अत्यवस्थ असुन त्याला उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार ब्रम्हपुरी तालुक्यातील १५ किमी अंतरावर असलेल्या गणेशपुर (मेंडकी) येथील एकाच गावातील चौघांचा विद्युत तारांच्या स्पर्शाने दुदैवी मुत्यु झाल्याची घटना सकाळी १०:३० वाजता समोर आली. सकाळच्या सुमारास गणेशपुर (मेंडकी) येथील सात शेतकरी शेतातील विहिरीतील मोटार पंपावरील केबल (वायर) टाकताना असताना अचानक तुटलेल्या केबलचा संपर्क पाण्याच्या प्रवाहाशी झाल्याने सातही शेतकऱ्यांना जोरदार विद्युत प्रवाहाचा धक्का बसला.

विद्युत प्रवाह इतका जोरदार होता की घटनेत पुंडलिक मानकर, प्रकाश राऊत, नानाजी राऊत, युवराज डोंगरे ह्या चौघांचा जागीच मृत्यू झाला तर इतर तीन शेतकरी गंभीर जखमी झाले. गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्यांनी घटनेची माहिती गावात देताच गावातील नागरिकांनी शेत शिवारकडे धाव घेतली. गंभीर स्वरूपात जखमींना खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

सदर घटनेची माहिती पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी यांना देण्यात आली.घटनास्थळी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी पंचनामा करून मृतदेह श्वछेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय ब्रम्हपुरी येथे पाठवण्यात आले. सदर घटनेची माहिती मिळताच विद्युत विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. गणेशपुर गावात सदर घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

गणेशपुर येथील सात शेतकरी आपल्या शेतात मोटार पंपावरील विद्युत केबल (वायर) टाकताना त्यांना विद्युत प्रवाहाचा धक्का बसला.आमच्या लाईन केबलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क आलेला नाही. मी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्यांनी कशासाठी तार टाकले ते समजले नाही.

दिनेश हनवते
विद्युत अभियंता
(गांगलवाडी सर्कल)

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये