Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ग्राहक पंचायतचा सुवर्ण महोत्सव समापण कार्यक्रम संपन्न

स्मरणिका प्रकाशन, उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा व पत्रकारांचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

      अखिल भारतीय ग्राहक पंचायत चा सुवर्ण महोत्सव समापण कार्यक्रम दि. ०५ सप्टेंबर ला शिंदे महाविद्यालयाच्या इंडोर स्टेडियम येथे पार पडला. या कार्यक्रमास डॉ. विवेक शिंदे, देशपांडे अतिरिक्त जिल्हाधिकारी, अजय भोसरेकर विज गाऱ्हाणे निवारण मंच पुणे आणि नाशिक झोन, राहुल राऊत नायब तहसीलदार, अखिल भारतीय ग्राहक पंचायत विदर्भ प्रांत पदाधिकारी श्रीपाद भट्टलवार, तुकाराम लुटे, डॉ. अशोक सोमवंशी तसेच तालुका भद्रावती चे वामण नामपल्लीवार आणि पुरूषोत्तम मत्ते उपस्थित होते.

     डॉ. विवेक शिंदे यांनी ग्राहक पंचायत ला नविन पिढीची गरज असून भविष्यात ग्राहक पंचायत कडून ग्राहक उपयोगी, सामाजिक न्यायासाठी नविन पिढी तयार करण्याची आवश्यकता आहे असे संबोधले. अजय भोसरेकर यांनी ग्राहक समस्या, हक्क, अधिकार तसेच विज ग्राहकांना येणाऱ्या समस्या व त्यांचे कायदेशीर निवारण कसे करायचे. या विषयी अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. अखिल भारतीय ग्राहक पंचायत च्या सुवर्ण महोत्सवी “भद्रावती दर्पण” या स्मरणिकेचे प्रकाशन देशपांडे अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.

*Mग्राहक पंचायत कडून उल्लेखनीय, सामाजिक कार्याबद्दल सत्कार :

     आपल्या योग कलेतून भद्रावतीचे नाव देशातच नाही तर विदेशात पोहचविणारी आकांक्षा कटलावार, सामाजिक जाणीव ठेवुन समाजासाठी कार्य करणारे ग्राहक पंचायतच्या प्रत्येक मोफत आरोग्य शिबिरास सर्व सुविधा उपलब्ध करून देणारे मनीष सिंग, अधिक्षक तालुका ग्रामिण रूग्नालय, तसेच शिवाजी महाराजांच्या गड, किल्ल्यांची माहिती आपल्या युट्युब चैनल मार्फत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचविणारे प्रशील अंबादे, रक्तदान महादान निस्वार्थ सेवा फाउंडेशन यांच्या रत्कदानाचे, सामाजिक कार्य बघता संस्थापक हकिम हुसैन यांना ग्राहक पंचायत भद्रावती कडून सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

भद्रावती तालुक्यातील अनेक पत्रकारांचा ग्राहक पंचायत कडून सत्कार :

     अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे ग्राहक जागृतीचे अनेक महत्वाचे विषय, सुचना नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे महत्वाचे कार्य केल्याबद्दल अखिल भारतीय ग्राहक पंचायत कडून सुवर्ण महोत्सवी अनेक पत्रकारांचा सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

     कार्यक्रमाला शहरातील दुकानदार, नागरिक तसेच अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्ह्यातील कार्यकारिणी सदस्य, महिला सदस्य, पत्रकार आणि ग्राहक उपस्थित होते.

     कार्यक्रमाचे संचालन डॉ. ज्ञानेश हटवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वामण नामपल्लीवार, पुरूषोत्तम मत्ते, वसंत वर्हाटे, शेखर घुमे, अशोक शेंडे, गुलाब लोणारे, महिला सदस्या माया नारळे, करूणा मोघे, शिला आगलावे, साखरकर, ढवळेे आणि इतर कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये