ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पीएम किसानचा चौदावा हफ्ता मिळणार

केवायसी केली नसेल तर मिळणार नाही योजनेचा लाभ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम किसान सन्मान योजना सुरु केली आहे. त्या योजनेनुसार शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी ६ हजार रुपये जमा केले जातात. शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम तीन टप्प्यात पाठवली जाते. आतापर्यंत या योजनेअंतर्गत १३ हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वर्ग करण्यात आली आहे. शेतकरी आता १४ व्या हप्त्याची रक्कम कधी येणार याची वाट पाहत होते. मात्र शेतकऱ्यांना आता १४ व्या हप्त्याच्या रकमेसाठी जास्त वेळ थांबावं लागणार नाही. तर जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वर्ग केली जाणार आहे.

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या १४ व्या हप्त्याची रक्कम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेली असणं आवश्यक आहे.
पीएम किसान सन्मान योजनेच्या १३ व्या हप्त्याची रक्कम २७ फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती. पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ काही शेतकऱ्यांना त्यांचं रेकॉर्ड अपडेट नसल्यानं मिळाली नव्हती. ज्या शेतकऱ्यांनी ते पूर्ण केलं असेल त्यांना १४ व्या हप्त्याची रक्कम मिळू शकते. प्रधानमंत्री किसान सम्मान योजनेचा चौदावा हफ्ता
मिळवण्यासाठी सेतू केंद्र, कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क करावा किंवा पीएम किसान अँप च्या माध्यमातून १२ जूनच्या आत ई – केवायसी पूर्ण करावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी वी. टी. वानखेडे, पी. एन.ढाकणे कृ. प।. केलकर कृ प बि.एस. चव्हाण यांनी केलं आहे.

पीएम किसानची रक्कम मिळवण्यासाठी ई केवायसी अनिवार्य

पीएम किसान योजनेची रक्कम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. जर ई-केवायसी केली नसेल तर शेतकऱ्यांना रक्कम मिळणार नाही. पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक नोंदवून ई-केवायची प्रक्रिया पूर्ण करावी. याशिवाय सीएससी केंद्रावर जाऊन देखील शेतकरी ही प्रक्रिया करु शकतात.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये