Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

…आणि व्यक्त झाले सेवानिवृत्त शिक्षक

जीवनात काय कमावले, काय गमावले, काय घडवले व सद्यस्थितीत काय सुरू आहे' यावरील मनोगताने सभागृह झाले भावनिक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

भद्रावतीत शिक्षक दिन व चक्रधर स्वामी जयंती निमित्त स्नेह मिलन सोहळा संपन्न

 स्व . श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूरचा स्तुत्य उपक्रम

       स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूरच्या माध्यमातून आज (दि. ५ सप्टेंबर) ला स्थानिक श्री. मंगल कार्यालय येथे शिक्षक दिन व चक्रधर स्वामी जयंतीच्या निमित्ताने सेवानिवृत्त, कार्यरत शिक्षक, कर्मचारी तथा ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनी यांच्या उपस्थितीत स्नेह मिलन सोहळा संपन्न झाला.

 या सोहळ्याला उद्घाटक स्वरूपात श्री. बळवंतदादा गुंडावार, सह-उद्घाटक माजी मुख्याध्यापक श्री. मदनराव ठेंगणे सर, तसेच सोहळ्याचे अध्यक्ष आनंदवनचे विश्वस्त श्री सुधाकरजी कडू सर तर प्रमुख अतिथी म्हणून श्री. ऍड. पुरुषोत्तमजी सातपुते, माजी मुख्याध्यापक श्री. भाऊरावजी कुटेमाटे सर, माजी मुख्याद्यापिका चंद्रकला पारोधे काकू, श्री. चंपतजी आस्वले, श्री. रामभाऊजी पारधी, श्री. विठ्ठलजी हनवते, श्री. देहारकार सर, श्री. पुरुषोत्तमजी मत्ते, श्री. कोरडे सर, श्री. अण्णाजी नवघरे, श्री. जांभुळकर सर, श्री. वैद्य सर, माजी नगरसेवक श्री. नंदू पढाल, श्री. सुधीर सातपुते, श्री. किसनजी माटे तसेच ट्रस्टचे अध्यक्ष श्री. धनराजजी आस्वले तथा ट्रस्टचे संस्थापक श्री. रविंद्र शिंदे उपस्थित होते.

 उपस्थित मंडळींनी त्यांच्या आयुष्यभरात शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाला मनोगतातून वाट मोकळी करुन दिली. याप्रसंगी ‘जीवनात काय कमावले, काय गमावले, काय घडवले व सद्यस्थितीत काय सुरू आहे, या विषयावर मंडळींनी मनोगत व्यक्त केले.

 कार्यक्रमाचे संचालन श्री. मंगेश भोयर यांनी केले तर प्रास्ताविक श्री. रविंद्र शिंदे यांनी केले. सोहळ्याला सरकारी अधिकारी, सेवानिवृत्त व कार्यरत शिक्षक, कर्मचारी तथा ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये