Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उत्सवादरम्यान परवानगीसाठी एक खिडकी प्रणाली सुरु

१३७ मंडळांनी केले अर्ज

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे गणेशोत्सवाप्रसंगी सार्वजनीक गणेश मंडळांना लागणाऱ्या विविध परवानगीसाठी सुरु करण्यात आलेल्या एक खिडकी प्रणालीस (single window system ) चांगला प्रतिसाद मिळत असुन आतापर्यंत १३७ सार्वजनीक गणेश मंडळांनी परवानगीसाठी अर्ज सादर केले आहेत. या सर्व मंडळांना प्रशासनाच्या विविध विभागातर्फे परवानगी देण्याची कारवाई सुरु आहे.

     येत्या ७ सप्टेंबरपासून शहरात दहा दिवस गणेशोत्सव साजरा होणार आहे. याकरीता गणेश मंडळांना महापालिका व इतर विभागाकडून रीतसर परवानग्या घ्याव्या लागतात. पोलीस स्टेशन, ट्राफिक पोलीस,सार्वजनिक बांधकाम, अग्निशमन, महावितरण केंद्र, महानगरपालिका इत्यादी विभागाच्या परवानगी या एकच ठिकाणाहुन घेता याव्या यासाठी एक खिडकी प्रणाली चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे सुरु करण्यात आली आहे.

     गणेश मंडळांना अर्ज करणे सोपे जावे याकरीता महानगरपालिका कार्यालयात एक खिडकी प्रणाली मदतकक्ष सुद्धा स्थापन करण्यात आला आहे. सुटीच्या दिवशीही सदर मदतकक्ष सुरु ठेवण्यात येत असल्याने सर्व गणेश मंडळांना त्याचा लाभ मिळत आहे.   https://pandal.cmcchandrapur.com या लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करता येऊ शकतो. मनपा हद्दीतील १३७ सार्वजनीक गणेश मंडळांनी आतापर्यंत परवानगीसाठी अर्ज सादर केले असुन अजुन संख्या वाढण्याची शक्यता आहे. गणेशोत्सव प्रदुषणमुक्त होण्याच्या दृष्टीने पीओपी मुर्तींना थारा न देता शाडूच्या मुर्तींचाच वापर करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये