Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरपना तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन

चांदा ब्लास्ट

सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य या योजने अंतर्गत खरीप २०२३ मध्ये सोयाबीन व कापूस पिकाची ई-पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांना एका पिकास दोन हेक्टर पर्यंतच्या मर्यादेत हेक्टरी ५००० रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे. सरकार सर्व पात्र शेतकऱ्यांना भरपूर प्रमाणात या योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न करीत आहे. सर्व शेतकरी या योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, यासाठी प्रयत्न करावेत.

आजच्या आर्थिक परिस्थितीत या योजनेचे महत्त्व अधिकच वाढले आहे. सरकार शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील आहे. कोरपना तालुक्यात कापूस पिकाचे ७६७२ वैयक्तिक खातेदार व ३८२५ सामायिक खातेदार असे एकूण ११४९७ शेतकरी तसेच सोयाबीन पिकाचे २५६१ वैयक्तिक खातेदार व १०९१ सामायिक खातेदार असे एकूण ३६५२ शेतकरी याप्रमाणे सोयाबीन व कापूस दोन्ही पिकांचे मिळून एकूण १५१४९ शेतकरी या योजनेअंतर्गत अर्थसहाय्य मिळण्यास पात्र आहेत. मात्र त्यापैकी ११३७६ शेतकऱ्यानी कागदपत्रे कृषि विभागाकडे जमा केलेली असून ३७७३ शेतकऱ्यांनी अजूनही कागदपत्रे कृषि सहायक यांच्याकडे सादर केलेले नाहीत. तरी अश्या शेतकऱ्यांनी त्यांचे संमतीपत्र व ना-हरकत प्रमाणपत्र लवकरात लवकर आपल्या कार्यक्षेत्रातील कृषि सहायक यांच्याकडे सादर करावे.

असे आवाहन कृषि विभागा मार्फत करण्यात आलेले आहे. अन्यथा कागदपत्रे जमा न केल्यास सदर शेतकरी अर्थसहाय्य च्या लाभापासून वंचित राहणार आहेत. तसेच खरीप हंगाम २०२३ मध्ये ई-पीक पाहणी केलेल्या व ७/१२ उताऱ्यावर कापूस/सोयाबीन पीक पेरा नोंद असलेल्या ज्या शेतकऱ्यांची नावे यादीत आलेली नाहीत अशा शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी कार्यालयास पुराव्यासह (नोंद असलेला ७/१२ ची प्रत) अर्ज करावेत. सदर बाबतीत शासन स्तरावरून सूचना प्राप्त झाल्यावर कार्यवाही करण्यात येईल.असे तालुका कृषी अधिकारी कोरपना यांनी कळविले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये