ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा तालुका पत्रकार संघाच्या कोषाध्यक्षपदी प्रा. अशोक डोईफोडे यांची निवड 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

शहरातील शासकीय विश्रामगृह येथे दिनांक १ सप्टेंबर रोजी द अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची सलग्नित देऊळगावराजा तालुका पत्रकार संघाची बैठक संघटनेचे अध्यक्ष गजानन तिडके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या बैठकीत सर्वानुमते ज्येष्ठ सदस्य प्रा.अशोक डोईफोडे यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली.

       देऊळगाव राजा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन तिडके यांच्या अध्यक्षतेखाली व कार्याध्यक्ष गणेश डोके उपाध्यक्ष मंगेश तिडके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेण्यात आली.या बैठकीमध्ये पत्रकार संघाच्या विविध विषयावर सकारात्मक चर्चा करण्यात आली. आणि विविध ठरावाला मंजुरात देण्यात आली.ज्येष्ठ पत्रकार प्रा.अशोक डोईफोडे सर यांची सर्वानुमते कोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली सर्व सदस्यांनी पुष्पहार देऊन प्रा.डोईफोडे सर यांचा सत्कार केला. या बैठकीला तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन तिडके कार्याध्यक्ष गणेश डोके, सचिव सुरज गुप्ता, उपाध्यक्ष मंगेश तिडके अशोक जोशी,संतोष जाधव, प्रा.अशोक डोईफोडे, प्रभाकर मान्टे, मुबारक शहा,शिवाजी वाघ,मोहम्मद जमील, राजेश पंडित, राजेश खांडेभराड, मुन्ना ठाकूर, संतोष वासुंबे, राहुल नायर,शेख कदीर,विजय जाधव,प्रवीण काकडे व महिला सदस्या किरण वाघआदींची उपस्थिती होती.बैठकीचे संचालन व आभार सचिव सुरज गुप्ता यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये