ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
पर्यावरण संवर्धन व विकास समितीच्या चंद्रपूर यवतमाळ जिल्हा संपर्क प्रमुख पदी नूतन लेडांगे यांची नियुक्ती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
पर्यावरण संवर्धन व विकास समिती महाराष्ट्र प्रदेशच्या चंद्रपूर यवतमाळ जिल्हा संपर्क प्रमुख पदी भद्रावती येथील नूतन लेडांगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्तीपत्र पर्यावरण संवर्धन व विकास समिती महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष, दलित मित्र तथा आदिवासी सेवक डी. के. आरीकर यांच्या हस्ते चंद्रपूर येथील पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृहात पार पडलेल्या एका सभेत प्रदान करण्यात आले.
यावेळी पी. एस. आरिकर, अतुल ठाकरे, प्रमिला लेडांगे तथा वैशाली बट्टे हे उपस्थित होते. लेडांगे यांच्या नियुक्तीमुळे चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील पर्यावरण चळवळीला गती प्राप्त होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. त्यांच्या या नियुक्तीमुळे त्यांचे जिल्ह्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे.